माहितीस्त्रोत – राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, पैठण रोड, छत्रपती संभाजी नगर
मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही जमिनीत निचरा लवकर होतो, तर भारी काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. शिवाय सतत रिमझिम पावसामुळे जमीन ओली असते. अशा जमिनीत तूर पिकावर खोडावर मुळावर फायटोप्थोरो या हानीकारक बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी आळवणी करावी
यासाठी मेटालॅक्झिल एक ग्रॅम एक लिटर पाण्यात (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम )घेऊन द्रावण तयार करत पिकाच्या मुळाभोवती आळवणी करावी व बुंध्यावर देखील द्रावण पडेल याची काळजी घ्यावी.
किंवा रेडोमिल अडीच ग्रॅम एक लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी ( 100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम )
अथवा जैविक बुरशीनाशक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, पैठण रोड. छत्रपती संभाजी नगर निर्मित बायोमिक्स याचा एकरी चार लिटर या प्रमाणे उपयोग करावा. २०० लिटर पाण्यात 4 लिटर बायोमिक्स हे बुरशीनाशक घेत पिकाची आळवणी करावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.