गणेश चतुर्थी
प्रथम नमन तुज एकदंता ।
रंगी रसाळ वोडवी कथा ।
मती सौरस करी प्रबळता ।
जेणे फिटे आता अंधकार ॥१॥
तुझिये कृपेचे भरिते ।
आणिक काय राहिले तेथे ।
मारग सिध्दाच्यानी पंथे।
पावविसी तेथे तूची एक ॥२॥
आरंभा आदी तुझे वंदन ।
सकळ करिता कारण ।
देव ઋषी मुनि आदी करून ।
ग्रंथ पुराण निर्माणी ॥३॥
काय वर्णू तुझी गती ।
एवढी कैंची मज मती ।
दीननाथ तुज म्हणती ।
करी सत्य वचन हेची आपुले ४॥
मज वाहावता मायेच्या पुरी ।
बुडता डोही भवसागरी ।
तुज वाचुनी कोण तारी ।
पाव झडकरी तुका म्हणे ॥५॥
सौजन्य – http://tukaram.com
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.