📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 4, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता

३ ते ७ सप्टेंबर दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, नाशिक व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव अधिक.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

पावसाची शक्यता –

आज बुधवार दि. ३ सप्टेंबर(एकादशी) पासुन रविवार दि. ७ सप्टेंबर(पौर्णिमे) पर्यन्तच्या पाच दिवसात संपूर्ण कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक जिल्ह्यात व संपूर्ण सह्याद्री घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव उत्तर, छ. सं. नगर, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात व संपूर्ण सह्याद्री घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

पावसाची उघडीप-

 सोमवार दि. ८ सप्टेंबर ते शुक्रवार दि. १२ सप्टेंबर च्या पाच दिवसात पूर्व विदर्भ वगळता, मुंबई व संपूर्ण कोकण सहित उर्वरित महाराष्ट्रात  उघडीपीची शक्यता जाणवते.

पुन्हा पावसाची शक्यता-

शनिवार दि. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यानच्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची हजेरी लागू शकते, असे वाटते.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

कृषी विकासासाठी भरीव तरतूद असणारा अर्थसंकल्प

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406