आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
गेल्या ५-६ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची अजुनही प्रगती नाही. खान्देश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही.
सध्याचे १०-१२ दिवस म्हणजे १९ जूनपर्यन्त पावसासाठी वातावरण अनुकूल नसले तरी उद्या गुरुवार दि. ५ जूनपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दि. ७ जूनपर्यंत नंदुरबार धुळे जळगांव नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यात व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भातील ११ जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता ह्या तीन दिवसात जाणवते.
कोकण -मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.