बायको – अहो, ऐकले का…? खिडकीला पडदे लावूया. समोरच्या घरात राहायला आलेला भाडेकरू चोरून आपल्या घरात वारंवार डोकावत असतो आणि मला पाहण्याचा प्रयत्न करत असतो.
कंजूष नवरा – जाऊ दे गं, एकवेळ त्याला व्यवस्थित पाहू दे. त्यानंतर तो स्वतःच घराला पडदे लावून घेईल.
आपण कामवाली ठेऊया…
नवरा – किती काम करशील, आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेऊ…
बायको – अजिबात नाही…आठवत नाही का, मी सुद्धा तुझ्याकडे कामवालीच होते.
माझी एक अट आहे…
बायको – माझी एक अट आहे
नवरा – काय ?
बायको – तुम्ही सोडायला आला तरच मी माहेरी जाणार.
नवरा – माझी पण एक अट आहे.
बायको – कोणती ?
नवरा – मी घ्यायला आलो तरच परत यायचे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.