medicinal-plant-ritha soap berry family
Home » रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  रिठा या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- रिठा

वनस्पतीचे वर्णन

            सेपोन्देसी वनस्पती कुळातील वृक्ष. हा सदाहरित वर्कश संयुक्त पानाचा असून २/३ पर्णीकाच्या जोड्या असतात. फुले हि पुष्प शाखेच्या टोकावर गुच्छात येतात. फळ पिकल्यावर त्यावर सुरकुत्या दिसतात.

औषधी उपयोग

            यामध्ये ११.५ टक्के सेपोनीन असते. पोट साफ होण्यासाठी आणि पोटाच्या इतर विकारासाठी रिठा अत्यंत उपयोगी आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांना रिठ्याच्या पाण्याने ब्रशने घासल्यास चकाकी यते. सांधेदुखी आणि अर्धांगवायूसाठी रिठ्याच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.

हवामान व जमीन

            या झाडाला कुठल्याही प्रकारची माती चालते. पोयट्याची जमीन आणि हमखास पाण्याची सोय असणाऱ्या  ठिकाणी रीठ्याची वाढ चांगली होते.

लागवड

            याची लागवड बियांपासून रोपे तयार करून करावी. याची लागवड गादी वाफ्यावर करावी. त्यास झारीने पाणी द्यावे. आवश्यकतेनुसार खते आणि पाण्याची सोय करावी. रोपांची ७ बाय ७ मीटर अंतराने लागवड केल्यास हेक्टरी २०० झाडाची लागवड करता येते. ३० बाय ३० बाय ३० सेमी खोल खड्डा करून लागवड करावी.

खते

            पावसाच्या सुरवातीस १५ ग्रॅम मिक्चर आणि पाण्याची सोय असल्यास दर महिन्याला १० किलो शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा रिंग पद्धतीने द्यावी.

काढणी

            साधारणपणे ७ ते ८ वर्षांनी झाडे फुलावर येवून फळे  लागतात. सुरवातीला प्रत्येक झाडापासून अर्धा किलोपासून ५ किलोपर्यंत उत्पन्न मिळते.

Related posts

करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

Atharv Prakashan

Neettu Talks : डाळींबाच्या सालीपासून बनवा चेहरा सुंदर…

Atharv Prakashan

कीटकनाशकांचा पक्ष्यांवरही परिणाम…

Atharv Prakashan

Leave a Comment