तुला कुणी न पाहिले
तरी सारे हतबल जाहले
जयासी तु केलास स्पर्श
त्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविले
काय गुन्हा केला आम्ही ?
म्हणुनी संकट आम्हावरी आणिले
कलीयुगात कलीने रुप दाखविले
संकटावरती मात करणेस सारेजण सिध्द जाहले
घरी राहणे पसंत केले वृध्द माणसे लहान बालके
यांना साऱ्यांनी सावरले
ओसाड रस्ता पाहुनी साऱ्यांचे भिरभिरती डोळे
हे सारे जाहले कशामुळे ?
डॉक्टर, नर्स, पोलिस परिचारिका
हे सारे तुला रोखण्यासाठी
रात्रंदिन काम करत राहीले
हा संघर्ष आम्ही करणारच !
हाच संघर्ष साऱ्यांना प्रेरणादायी ठरणारच !
हे गुरुमाऊली देवदेवतांनो
तुझी ही लेकरे आहेत ग अजाण
सारे झटती डोळ्यात आणुणी पंचप्राण
हे सेवाव्रत आचरिले त्या सर्वांना वंदण
त्या सर्वांचेही रक्षण कर ग माऊली
तुला करते हात जोडूनी नमन
श्रीमती उज्ज्वला देशपांडे, ठाणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.