🍊मोसंबी फळ पीक सल्ला 🍊
आंबिया बहारसाठी बऱ्याच मोसंबी बागांना अजून ताण बसलेला नाही. काही बागांमध्ये पानगळ रोगामुळे दिसत आहे. जमिनीत २ फूट खोल ओल असेल तर झाडांना ताण बसलेला नाही असे समजावे. त्यामुळे लगेच पाणी देण्याची घाई करू नये.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीनुसार पाणी सोडू शकता. सध्या थंडी जास्त असल्यामुळे ताण बसण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. तरीही जर अपेक्षित ताण बसत नसेल, तर जमिनीच्या प्रकारानुसार लिहोसिन २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
👉 ताण आणि काडी मजबूत होण्यासाठी पूरक उपाय म्हणून, लिहोसिन फवारणीसोबत
0:52:34 (वॉटर सोल्युबल खत) 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करता येते.
यामुळे काडी मजबूत होते, फुलकळी धरण्यास मदत होते आणि आंबिया बहार येण्यास पोषक वातावरण तयार होते.
फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, धुके व कडाक्याची थंडी नसताना करावी आणि फवारणीनंतर काही दिवस पाणी देणे टाळावे.
– डॉ. योगेश मात्रे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
