नाती
नाती ही सगळ्यांना एकत्र आणतात
रक्ताची नसली तरी
प्रेमाने आपलंसं करतात
फ़ुलांवर बसून फुलपाखरासारखी एकरूप होणारी असतात नाती
तर कधी कमळाच्या पानावरुन
निसटून जाणाऱ्या दवबिंदू सारखी असतात नाती
आंतरमनाच्या कोपऱ्यात उमलतात नाती
प्रेम आणि विश्वासाने फुलतात नाती
शिंपंल्यातील मोत्यांप्रमाणे जपावी लागतात नाती
नाहीतर गैरसमजाच्या लाटेने विरुन जातात नाती
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.