आई
दूर दूर लांब तू गेलीस ग आई
हाक मारली तर जवळ आता नाहीस तू आई
तुझ्या आठवणींना मागे सोडून गेलीस
अनंतामध्ये तू विलीन होऊन गेलीस
तुझ्या हाकेची इतकी सवय झाली होती
पण तुझा आवाज आता ऐकू येत नाही
इतकी वर्ष आमचा तू आधार बनून राहिलीस
तुझ्या मायेनी घट्ट बांधून ठेवलस आई
पडलं झडल आजारपणात जवळ होतीस नेहमी
तुझ्या नुसत्या स्पर्शान बर वाटायचं आई
आमच्या चुकांकडे तू दुर्लक्ष केलं नाहीस
चांगल्या वाईटाची नेहमी शिकवण दिलीस आई
आमच्यासाठी आयुष्य तुझं वेचलस ग आई
तुझ्या स्वप्नांचा कधी विचार केला नाहीस
अंतःकरणातील तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही
तुझ्या आठवणीने डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत
आज जरी तू नाहीस तुझे आशिर्वाद आहेत
जिथे कुठे तू आहेस तिथून, तुझ बारीक लक्ष आहे