June 19, 2024
Estimated foodgrain production in the country is 3288.52 lakh tonnes
Home » देशात 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशात 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

देशात यावर्षी एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज, गेल्या 5 वर्षांतील सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार

नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष 2023-24 साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.गेल्या कृषी वर्षापासून, उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणून, लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पन्नाच्या या आगाऊ अंदाजामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून (एसएएसएएस) मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीची वैधता तपासून, दूरस्थ संवेदक प्रणाली, साप्ताहिक पीकविषयक हवामान निरीक्षक गट आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी ती जोडण्यात आली. त्याबरोबरच, हा अंदाज तयार करताना, वातावरणाची स्थिती, पूर्वीचे कल, दरातील चढउतार, मंडयांमध्ये कृषी उत्पादनांचे आगमन इत्यादी घटक देखील विचारात घेण्यात आले.

विविध पिकांच्या उत्पादनांचे तपशील असे –

एकूण अन्नधान्य – 3288.52 लाख टन

 • तांदूळ -1367.00 लाख टन
 • गहू – 1129.25 लाख टन
 • मका – 356.73 लाख टन
 • श्री अन्न– 174.08 लाख टन
 • तूर – 33.85 लाख टन
 • हरभरा – 115.76 लाख टन

एकूण तेलबिया– 395.93 लाख टन

 • सोयाबीन – 130.54 लाख टन
 • रेपसीड आणि मोहरी– 131.61 लाख टन

ऊस– 4425.22 लाख टन

 • कापूस – 325.22 लाख गासड्या (प्रत्येकी 170 किलो)
 • ताग – 92.59 लाख गासड्या (प्रत्येकी 180 किलो)

यावर्षी देशात एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन,वर्ष 2022-23 मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या 5 वर्षांत (वर्ष 2018-19 ते 2022-23 मध्ये) झालेल्या 3077.52 लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे. खरीपातील पीक उत्पादनाचे अंदाज तयार करताना, पीक कापणी प्रयोगांवर (सीसीईएस) आधारित उत्पन्न देखील विचारात घेतले आहे.

बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा 2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा  2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ  अंदाज प्रसिद्ध केला आहे.

एकूण फलोत्पादन2022-232023-24(पहिला आगाऊ अंदाज)2023-24(दुसरा आगाऊ अंदाज)
क्षेत्रफळ (दशलक्ष हेक्टरमध्ये)28.4428.7728.63
उत्पादन (दशलक्ष टन मध्ये)355.48355.25352.23

वर्ष 2023-24 चे ठळक मुद्दे (दुसरा आगाऊ अंदाज)

 • वर्ष 2023-24 मध्ये देशातील फलोत्पादन उत्पादन (दुसरा आगाऊ अंदाज) सुमारे 352.23 दशलक्ष टन राहील असा  अंदाज आहे, जे वर्ष 2022-23 (अंतिम अंदाज) च्या तुलनेत सुमारे 32.51 लाख टन (0.91%) कमी आहे.
 • फळे, मध, फुले, लागवड केलेली पिके, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात 2023-24 (अंतिम अंदाज) मध्ये वाढ दिसून आली आहे, तर भाजीपाल्यांमध्ये घट झाली आहे.
 • केळी, लिंबूवर्गीय/लिंबू, आंबा, पेरू आणि द्राक्षे यांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे फळांचे उत्पादन 112.63 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सफरचंद आणि डाळिंबाचे उत्पादन वर्ष 2022-23 च्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे.
 • भाजीपाला उत्पादन सुमारे 204.96 दशलक्ष टन होण्याची कल्पना आहे. दुधीभोपळा, कारली, कोबी, फ्लॉवर, भोपळा, टॅपिओका, गाजर आणि टोमॅटोच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे, तर कांदा, बटाटा, वांगी आणि इतर भाज्यांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे.
 • वर्ष 2023-24 (दुसरा आगाऊ अंदाज) मध्ये 242.12 लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे जे मागील वर्षीच्या 302.08 लाख टनाच्या तुलनेत सुमारे 60 लाख टनांनी कमी असेल.

Related posts

देहाचा विसर हीच आत्मानुभूतीची पहिली पायरी

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406