December 3, 2024
Freelance as a carrer article by rajendra ghorpade
Home » सखोल वृत्तलिखाणामुळेच मुक्त पत्रकारितेच्या संधीत वाढ
मुक्त संवाद

सखोल वृत्तलिखाणामुळेच मुक्त पत्रकारितेच्या संधीत वाढ

नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण ब्लॉग लिहीता ? कितीजणांना वेगळे विषय लिहीण्यात रस आहे ? कोणत्या प्रकारचे लिखाण तुम्ही करता ? कितीजणांना असे वाटते आपण स्वतंत्रपणे लिखाण करायला हवे ? लेखक पुस्तक लिहितो पण हे पुस्तक लिहिताना त्याचे वाचणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या विषयातील सर्व गोष्टी जाणून घेण्यात रस असायला हवा. तेंव्हाच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकाल.

तुम्हाला नारद मुनी माहीत आहेत का ? ते कोणते काम करायचे ? तसा हा संशोधनाचा विषय आहे. नारद हे कोणत्याही राजाकडे कामाला नव्हते. विना घेऊन सर्वत्र हिंडायचे. पण सर्व राजांच्या दरबारात त्यांना मानाचे स्थान होते. इंद्राच्या दरबारात गेले तरीही मान, इतर देवतांच्या दरबारात गेले तर प्रथम त्यांचाच मान असायचा. असे कोणते काम करायचे ज्यामुळे त्यांना सर्वत्र मान अन् आदरसत्कार मिळत होता. त्यांना जगात घडणाऱ्या सर्व घडामोडीची माहिती असायची. त्यामुळे त्यांना मागणी प्रचंड होती. मोठ मोठे राजेही त्यांना स्वतःहून बोलवून घेत. या कामाचा मोबदलाही त्यांना चांगला मिळत असे.

म्हणजेच आपणच आपला ब्रँड व्हायचे. आपल्या नावालाच मागणी असावी असे व्यक्तीमत्व आपण घडवायचे. आपली गरज सर्वांना वाटावी असे काम, कर्तृत्व आपण घडवायला हवे. राजाचे काम अडले की राजाला नारदाची आठवण होत असे. तसे आपण आपले व्यक्तिमत्त्व घडवायचे. आपण त्यांचे काम करून द्यायचे अन् त्याचा चांगला मोबदला आपण मिळवायचा. नारदाला सर्वच राजांकडून मागणी होत असे. तशी विविध कंपन्यांकडून आपल्या नावाची मागणी व्हायला हवी. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकवेळी आपल्याला काम मिळेलच असे नाही. पण कंपनीने ते काम आपणालाच द्यायला हवे असे व्यक्तीमत्व आपले असायला हवे. मुक्त पत्रकारही असेच व्यक्तिमत्त्व आहे.

मुक्त पत्रकारिता…

फ्रिलान्स अर्थात मुक्त पत्रकार हा कंपनीत कामाला नसतो पण कंपनीचे काम तो करत असतो. वृत्तपत्रात आपण कामाला नसतो पण वृत्तपत्रातील स्तंभ नियमितपणे आपल्या नावाने प्रसिद्ध होतात. त्याचा उत्तम मोबदलाही आपणाला मिळतो. मुक्त पत्रकार हा एक लेखक असतो जो स्वयंरोजगारी असतो. ते वृत्तपत्रे, मासिके, कंपन्या आणि इतर संस्थांसाठी कराराचे काम किंवा नियमित नेमून दिलेले काम पूर्ण करतात. त्यांना यातून त्याच्या कामाचा मोबदला मिळतो. त्यामुळे मुक्त पत्रकारांना कंपनीचे किंवा संस्थेचे बंधन नसते. कंपनीत आठ तास कामावर हजर राहावे याचे बंधन नाही. आज सुट्टी घ्यावी वाटली तर ते निर्णय घेण्यासाठी मुक्त असतात. स्वतंत्रपणे ते काम करत असतात. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य असते. इतकेच काम तर स्वतःच्या कामाचा मोबदला स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्यही मुक्त पत्रकाराला असते. इतके मानधन देत असाल तर लेख देऊ अशी अट ते घालू शकतात.

फ्रिलान्सर होण्यासाठी हे आवश्यक…

  • तुमची सेवा आणि ऑफर परिभाषित करा…
  • आपले लक्ष्यित प्रेक्षक शोधा….
  • किंमतीची रचना विकसित करा…
  • एक अद्भुत व्यक्तिमत्त्व विकसित करा…
  • छान प्रस्ताव लिहा….
  • तुमच्या ग्राहकांशी उत्तम नाते निर्माण करा….
  • आपली कौशल्ये विकसित करणे सुरू ठेवा…
  • इतर फ्रीलान्सर्ससोबत संपर्क ठेवा…
  • नेहमी नवनव्या संधी शोधत राहा…

संधी आणि महत्त्व

2025 पर्यंत फ्रीलान्सिंग इंडस्ट्रीमध्ये भरभराट होणार आहे. फ्रीलांसिंग उद्योग आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. 57 दशलक्ष अमेरिकन देशाच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेत योगदान देणारे आहेत. भारतात अंदाजे 15 दशलक्ष फ्रीलांसर विविध डोमेन जसे की IT, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट, डेटा एंट्री आणि इतरांवर काम करतात.

मुक्त पत्रकारिता वाढण्याची कारणे…

  • उत्तम काम-जीवन संतुलन – फ्रीलांसर स्वत: च्या तासांची निवड करू शकतो. कुठूनही काम करू शकतो, ज्यामुळे काम आणि जीवन यांच्यात चांगले संतुलन होऊ शकते.
  • लवचिकता – फ्रीलांसर एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करू शकतात आणि अधिक कमावू शकतात.
  • विशिष्ट प्रकारच्या लेखनाची मागणी- कॉपीरायटिंग, पब्लिक रिलेशन्स मार्केटिंग, गेस्ट ब्लॉगिंग, ई-बुक्स आणि घोस्ट रायटिंग यासारख्या विविध प्रकारच्या लेखन नोकऱ्यांना जागतिक मागणी आहे.
  • टेलिव्हिजन बातम्यांचा परिणाम – सखोल माहितीची, सामग्रीची गरज वाढली आहे, ज्यामुळे फ्रीलान्स लेखकांसाठी संधी निर्माण झाली आहेत.

वेब पोर्टल संघटनेकडील नोंदीनुसार महाराष्ट्रात सुमारे पाच हजार न्यूज वेबसाईट आहेत. डेलिहंटवर १५० हून अधिक वेबसाईट आहेत. त्यामध्ये १०० च्यावर न्यूज वेबसाईट आहेत. विविध विषय घेऊन न्यूज वेबसाईट तयार करण्याकडे कल वाढला आहे. मनोरंजन, स्पोर्ट, लाईफस्टाईल, कृषी, उद्योग, अर्थकारण, शिक्षण, करिअर ( स्पर्धा परीक्षा ), आरोग्य, व्यायाम अर्थात योगासने, अध्यात्म, क्राईम, तंत्रज्ञान, पर्यटन, अॅटो, टेंडर घडामोडी, साखर घडामोडी अशा विविध विषयांच्या वेबसाईट आहेत.

डिजिटल पत्रकारितेमध्ये येत असलेले नवे ट्रेंड…

एकच विषय घेऊन त्या विषयाची सखोल माहिती देणाऱ्या वेबसाईटची संख्या आजकाल वाढत आहेत. असे विषय हाताळणाऱ्यामध्ये मुक्त पत्रकारांची संख्या अधिक आहे.

  • ज्योतिष वेबसाईट – रोजचे भविष्य, राशीफळ (चक्र), साप्ताहिक भविष्य, वार्षिक भविष्य, भविष्यातील प्रकार ( करिअर, अर्थ, आरोग्य, प्रणय-प्रेम )
  • अध्यात्म – वृत्त, आध्यात्मिक विचार, नित्य साधना – योग, सण-समारंभ, तज्ज्ञांच्या मुलाखती, आध्यात्मिक पर्यटन
  • साखर – भारतातील साखर बातम्या, आंतराराष्ट्रीय साखर बातम्या, इथेनॉल बातम्या, कृषी कमोडिटी बातम्या
  • साखर हा विषय तसा पश्चिम महाराष्ट्रातील आहे. विदर्भाचा विचार करता येथे संत्रा, कापूस अन् सोयाबिन या पिकांच्या घडामोडीची एकत्र सखोल माहिती देणारी वेबसाईट काढता येणे शक्य आहे. या विषयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देणारे ते व्यासपीठ ठरू शकते.
  • लाईफस्टाईल – बदलती जीवनशैली, फॅशन, रिलेशनशिप, हेल्थ, त्वचेचे सौंदर्य, आहार,
  • बाईमाणूस – महिलांसाठीची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींची ऑनलाइन आणि ‘ग्रासरूट’ चळवळ, केवळ महिलांचे विषय अन् बातम्या, आदिवासी महिला, दलित-भटके विमुक्त, बाईमाणूस’ ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींची ऑनलाइन आणि ‘ग्रासरूट’ चळवळ आहे. ‘असा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे.
  • सहकार – सहकार क्षेत्रातील घडामोडी, यात सहकारी कारखाने, सोसायट्या, पतसंस्था, बँका, उद्योग यांचा समावेश
  • टेंडर – राज्याच्या विविध विभागातील टेंडर वृत्त, टेंडरमधील घोटाळे, टेंडर संदर्भातील तक्रारी, विविध कंपन्यांची टेंडर
  • शेती – घडामोडी, तंत्रज्ञान, यशोगाथा, कृषी सल्ला, हवामान, बाजारभाव
  • पर्यटन – आंतरराष्ट्रीय, समुद्री, हिवाळी, धार्मिक, क्रिडा, पक्षी निरिक्षण पर्यटन, सांस्कृतिक, आरोग्य, साहसी, इको पर्यटन, कृषी, गार्डन, जिओ टुरिझम असे विषय घेऊन पर्यटनाची सखोल माहिती उपलब्ध करून देण्याची
  • अर्थकारण – आर्थिक घडामोडी, शेअर, कमॉडिटी, गुंतवणूक, खरेदी, विमा, कर्ज, विविध कर,
  • चळवळी – जगभरात होणाऱ्या चळवळी, शेती, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, सामाजिक-आर्थिक चळवळ (उदा. देवदासी निर्मुलन), शैक्षणिक, साक्षरता, व्यसनमुक्ती, जमीन वाचवा चळवळ
  • क्राईम – गुन्हे वृत्त, कायद्याची चौकट, सायबर क्राईम, सायबर सुरक्षा, असा घडला गुन्हा, खरा गुन्हेगार कोण ?, गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रयत्न

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading