घराघरावर तिरंगा हा लावुया
मनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया
तिरंगा आमुची शान
त्याच्यासाठी देऊ प्राण
चला तिरंग्याचा मान वाढवुया
घराघरावर तिरंगा हा लावुया.
लहान मोठे असो कुणी
देशासाठी तयार नेहमी
देशवीरांचे क्रांतिकार्य घराघरात स्मरूया
प्रांत आणि भाषा अनेक
तरीही असे मंत्रच एक
अनेकतेतही एकतेचे सुत्र बांधूया.