April 4, 2025
go-forward-by-accepting-change-article-by-prashant-daithankar
Home » युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज

राष्ट्रीय युवक दिन विशेष

स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार दिले.. आचरणात आणण्यात आधी पिढी आणि सध्याची पिढी देखील कमी पडताना दिसते.

कष्टाविण फळ ना मिळते
तूज कळते परी ना वळते

… या गोंधळाच्या स्थितीत असणाऱ्या युवकांना किमान राष्ट्र संपन्न करण्यासाठी आवश्यक असणारे योग्य ते वळण सापडो या सदिच्छेसह, शुभेच्छा.

प्रशांत दैठणकर

गेल्या 12 वर्षात अनेक स्थित्थंतरे या जगात झाली. अनेक तंत्रात क्रांती आपण बघितली पण प्रकर्षानं जाणवतं की जगाच्या तुलनेत आजच्या युवा पिढीत झपाटयाने बदल दिसत नाही. .. कोलावरी हे निमित्त होतं नवे बदल स्विकारण्याचं नव्या रिती पध्दती आपण स्विकारुन त्याचा वापर करीत पुढे जाण्याचं. काही प्रमाणात बदल आहेत आणि ते स्वागतार्ह असेल तरी त्यांची गती खूप कमी आहे असे कालमापन पट्टीवर आपणास जाणवेल.

शब्दांमध्ये बदल स्विकारणं आणि नवनवीन शब्द आपल्या कोषात वाढवणं हे काम ऑक्सफर्ड शब्दकोष सातत्यानं कारतोय… आपली मराठी भाषा देखील अशीच आहे आपणही नव्याचा शोध घेतो, बोध घेतो पण त्याचा अंगीकार किती करतो हा खरा सवाल आहे. इतर भाषिक शब्द स्विकारताना तिथल्या जीवनपध्दती आणि त्यांची शैली आपण अंगिकारतो हा खरा सवाल आहे.

आपण साधारण 1990 च्या आसपास LPG धोरण स्विकारले. LPG अर्थात लिबरलायझेशन, प्रायवेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन.. याचा स्विकार आपल्या अर्थव्यवस्थेत करावा लागला कारण जागतिक व्यापार कराराचा तो भाग होता… इथं खरी संधी आपणास होती पण आजपर्यंत याचा अर्थ आपल्या युवा पिढीने नेमकेपणानं समजून घेतलाच नाही.

आजही आपली शिक्षण पध्दती डॉक्टर, अभियंता या स्वप्नांचा बागुलबुवा दाखवत नाचणारी आणि याचं गाजर समोर ठेवून धावणारी ठरली आहे. यात पालकवर्ग देखील तितकाच जबाबदार आहे. ही दोन क्षेत्र वगळली तर पुढची धाव ही स्पर्धा परिक्षा अर्थात UPSC व MPSC याकडे आहे आणि त्यानंतरचं कुंपण शासकीय (स्थिर नोकरी) इतकच आहे असं पालक मानतात. मग तीच चूक त्यांची भावी पिढी अर्थात आजचे युवक करताना दिसते.

इंग्रज भारतात आले यावेळी त्यांना प्रशासन चालवण्यासाठी स्थानिक सहाय्यक हवे होते. यासाठी गुरुकुल व कौशल्याची शाळा मोडून त्यांनी शाळा-महाविद्यालयांच्या रुपाने बाबूगिरी चे कारखाने सुरु केले आणि आम्ही इंग्रज गेल्यानंतर 75 वर्षांनी अद्यापही त्याच कारखान्याच्या गर्तेत सापडलेलो आहोत हे वास्तव आहे.

कौशल्य हा शब्द नव्याने युवापिढीला सांगावा लागतो हे हेच वास्तव आणि सर्वात मोठं दुर्दैव आहे… अमेरिकेत रोजगारासाठी धावणं कमी आणि रोजगार निर्मिती अधिक आहे. तिथ ब्रेड-बटर ची हाव नसून संपत्तीसाठी धाव आहे. कारण त्यांना संपत्ती आणि संपन्नतेची ओळख आहे, ज्ञान आहे आणि त्याचा वापर करुन प्रत्येक व्यक्ती संपन्न होण्याचा प्रयत्न करताना आपणास दिसेल. व्यक्ती संपन्न तर समाज संपन्न होईल आणि असा समाज आर्थिक सत्ता बनत असतो.

सामुहीक विकास ही संकल्पना आपल्याकडे रुजली नाही. आपण रुजवली ती जात निहाय गर्वाची उतरंड आणि त्यातील पिढयान् पिढी वादांसह रसातळाला जाणाऱ्या संपत्तीचा इतिहास आणि तोच वारसा आजही पुढे नेला जात आहे. आपण संपन्नता आर्थिक गणितांशी जुळवली इन्कम आधारित समाज अर्थसत्ता होवू शकत नाही कारण असा समाज किश्तों पे जिंदगी जगत असतो.

आपण साक्षर झालो असलो तरी सुशिक्षीत झालो आहोत का हा देखील एक प्रश्न आहे. भौतिक आणि ऐहिक सुखासाठी कर्जात बुजलेले आपल्या आसपास कमी नाही… घरातले साधेसाधे समारंभ साजरे करताना लाखोंची उधळण आणि दुसऱ्या बाजुला कर्जांचे डोंगर दिसतील. कोरोना काळात यातील स्पष्टपणा अधिक समोर आला. सामाजिक सुरक्षा नाही आपण लाखांचा मोबाईल घेऊन त्याला 10 हजारांची सजावट करतो. परंतु लाखामोलाच्या जीवाचा विमा… ? आपण नेमकं काय करतोय याचं भान यावं ही काळाची गरज आहे.

स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण व्हा असे मोठे फलक लावणारे क्लासेस आणि त्यात जाणारे देशातले लाखो विद्यार्थी किती यशस्वी झाले… क्लासेस वाले मात्र गडगंज कमावत आहे.. सर्वच क्षेत्रात कमी फार फरकाने याचेच प्रतिबिंब जाणवेल. हल्ली आलेला झटपट श्रीमंतीचा फंडा आणि त्याला भुललेल्यांपैकी शेकडोंनी लावून घेतला फाशाचा फंदा हा आज वृत्तपत्रात दिसणारा नियमित प्रकार आहे.

स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार दिले.. आचरणात आणण्यात आधी पिढी आणि सध्याची पिढी देखील कमी पडताना दिसते.

कष्टाविण फळ ना मिळते
तूज कळते परी ना वळते

… या गोंधळाच्या स्थितीत असणाऱ्या युवकांना किमान राष्ट्र संपन्न करण्यासाठी आवश्यक असणारे योग्य ते वळण सापडो या सदिच्छेसह, शुभेच्छा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading