January 28, 2023
Damasa Marathi Literature award
Home » दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन…
काय चाललयं अवतीभवती

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन…

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन…

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येतात. यंदाही यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तरी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके येत्या ३१ जानेवारी २०२३ पर्यत पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा,ललित), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रह), कृ. गो.सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधन ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कार आणि विशेष पुरस्कारही देण्यात येतो.

इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती , फोटो आणि परिचय अर्जासोबत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी-६, स्मृती आपर्टंमेंट, बाबूजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६०१२ या पत्यावर पाठवावे.असे आवाहन सभेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related posts

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ – नरेंद्र मोदी

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

Leave a Comment