कवी मुरलीधर डहाणे नाना(मोर्शी) यांचे 19 मार्च रोजी अन्नत्याग करण्याचे आवाहन
लेहगाव जाऊ
चल शामा भिमा चल दादा भाऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच।
नाय कोणत्या नेत्यांचं पुढाऱ्यांच।
साहेबराव करपे हो समजून घेऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
बिल मोटर पंप होते जरा थकले।
वेळेवरतऺ करपे भरू नाय शकले।
कंपनीनं लाईन कापली हो भाऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
करपेची हो हिम्मत खचून गेली।
सहपरीवार हो आत्महत्या केली।
आलं नाही सरकार नेताहो भाऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
अमरभाऊन घेतला प्रश्नहो हाती।
किसान पुत्र आंदोलन त्यासाठी।
एकोणीस मार्च महाराष्ट्रात भाऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
संदिप रोडेच आपलं आहे नेतृत्व।
आपण सारे जाऊ दाखवू कर्तृत्व।
जात पात पक्ष आपला घरी ठेऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
नको आत्महत्या पुढाऱ्या भैटनऺ।
नाना म्हणते घेऊ हातात रुमणऺ।
सरकारा एकी आपली हो दाऊ।
आंदोलना सारे लेहगावला जाऊ।
मुरलीधर डहाणे नाना, एक आंदोलक शेतकरी
मोबाईल – 9970816301
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.