संशोधन आणि धोरणे चर्चासत्रात सहभागीचे विचार ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा
कोल्हापूर – नवोन्मेष आणि स्टार्टअप यांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठामध्ये तीन महत्त्वाची चर्चासत्रे पार पडली.
पहिल्या चर्चासत्रात संशोधन आणि धोरणे या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. सी.व्ही. रोडे यांच्यासह बारामतीचे कृषी उद्योजक संकेत भोसले, कायपी मशीन्सचे संजय पेंडसे, शिंपुगडे उद्योग समूहाचे चेअरमन बी. एस. शिंपुगडे आणि बँक ऑफ इंडियाचे गणेश गोडसे सहभागी झाले. डॉ. आण्णासाहेब गुरव अध्यक्षस्थानी होते.
दुसऱ्या चर्चासत्रांत महिला उद्योजकांना नवोपक्रम आणि स्टार्टअप उपक्रमांमध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने या अनुषंगाने तपशीलवार चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यापीठाच्या ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुजाता कणसे, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, भारती डिजीटलच्या तनुजा शिपूरकर, ‘छबी ब्रँड’च्या सुप्रिया पोवार आणि प्युअरमी ऑर्गेनिकच्या शर्मिली माने यांनी सहभाग घेतला. डॉ. दीपा इंगवले अध्यक्षस्थानी होत्या.
तिसऱ्या चर्चासत्र हे यशस्वी स्टार्टअपच्या यशकथांनी रंगले. यामध्ये श्रील सूर्या रिसर्च कंपनीच्या सुप्रिया कुसाळे, थिंकमाँक एज्युटेकचे जैमीन शाह, बायोब्रिट कंपनीचे परिमल उदगावे, आरडे-पाटील फार्माचे सत्यनारायण आरडे, गोला कंपनीचे वरुण जैन आणि टेक-पीएमजी बिझनेस सोल्युशनचे अमित चव्हाण यांनी आपापल्या संघर्षाचा काळ आणि त्यातून यशापर्यंत केलेली वाटचाल याविषयी सांगितले.
फेलोशीप घेणाऱ्यांनी सहभागी व्हायला हवे: प्र-कुलगुरू डॉ. पाटील
शिवाजी विद्यापीठासह अनेक वित्तीय संस्थांकडून अनेक संशोधकांना फेलोशीप मिळतात. मात्र, अशा संशोधकांचा आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा गेल्या दोन दिवसांतल्या नवोपक्रम व स्टार्टअप परिषदेत अल्प सहभाग दिसला. या सर्व फेलोशीपधारकांनी पुढील वर्षापासून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी समारोप समारंभात व्यक्त केली. या परिषदेच्या माध्यमातून स्टार्टअपच्या अनुषंगाने एक उत्तम इकोसिस्टीम विद्यापीठात आकारास येत आहे, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
परिषदेचा समारोप समारंभ त्यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगांवकर, डॉ. प्रकाश राऊत आणि डॉ. सागर डेळेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी परिषदेत सहभागी उद्योजक, व्यावसायिक आणि शाळा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.