📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 15, 2026
काय चाललयं अवतीभवती

भारत-अमेरिका व्यापार पोर्टलवरील मोठी तांत्रिक त्रुटी ‘आयटीएके’च्या लढ्यामुळे दूर Kolhapur IT Export Summit 2026

SEPC Director General Dr. Abhay Sinha addressing Kolhapur IT Export Summit 2026 alongside ITAK members after India-USA Trade Portal update benefiting SEPC-registered IT companies.
  • ‘एसईपीसी’च्या महासंचालकांचा ऐतिहासिक कोल्हापूर दौरा
  • ‘कोल्हापूर आयटी एक्सपोर्ट समिट २०२६’ ला आयटी उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : ‘आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर’च्या (ITAK) अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरच्या माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्राच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.नवी दिल्ली येथील ‘सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’चे (SEPC) महासंचालक डॉ. अभय सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल मराठा रेसिडेन्सी (ताराबाई पार्क) येथे आयोजित ‘कोल्हापूर आयटी एक्सपोर्ट समिट २०२६’ अत्यंत दिमाखात आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो आयटी व्यावसायिकांच्या प्रचंड उत्साहात पार पडले. या परिषदेत कोल्हापूरच्या आयटी उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी एका विशेष ‘कोल्हापूर आयटी स्पेसिफिक एक्सपोर्ट प्लॅन’वर शिक्कामोर्तब करण्यात आले.

परिषदेची पार्श्वभूमी आणि कोल्हापूरच्या आयटी क्षमतेचे सादरीकरण

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, ‘आयटीएके’चे सचिव राहुल मेंच यांनी या ऐतिहासिक बैठकीमागील भूमिका आणि या समिटचा मुख्य उद्देश उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर ‘आयटीएके’चे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राची ताकद आणि येथील ५०० हून अधिक कंपन्यांची बौद्धिक क्षमता (उदा. बँकिंग, ईआरपी, सायबर सिक्युरिटी, हेल्थकेअर, एव्हीजीसी) प्रभावीपणे मांडली.

भारत-अमेरिका व्यापार पोर्टलवरील त्रुटी दूर; देशभरातील कंपन्यांना फायदा

या परिषदेतील सर्वात मोठी घोषणा म्हणजे ‘आयटीएके’च्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय धोरणात झालेला महत्त्वपूर्ण बदल. अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या (https://indiausatrade.mea.gov.in/) या पोर्टलवर नोंदणीसाठी ‘SEPC’ या प्रमुख संस्थेचा समावेश नव्हता. यामुळे कोल्हापूरसह देशातील हजारो सॉफ्टवेअर व इतर सेवा देणाऱ्या कंपन्या जागतिक संधीपासून वंचित होत्या. ‘आयटीएके’ने ही तांत्रिक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, अवघ्या काही दिवसांत केंद्र सरकारने ‘SEPC’ चा समावेश या अधिकृत यादीत केला. या यशामुळे आता भारतातील ‘SEPC’ नोंदणीकृत आयटी कंपन्यांना अमेरिकेत थेट सॉफ्टवेअर व इतर सेवा निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

‘निर्यातीत सेवा क्षेत्राचे ४८ टक्के योगदान’ – डॉ. अभय सिन्हा

समिटमध्ये डॉ. अभय सिन्हा यांनी सांगितले की, “सध्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४८ टक्के वाटा सेवा क्षेत्राचा आहे. कोल्हापूरच्या आयटी उद्योजकांचा उत्साह पाहता, हे शहर भविष्यात देशातील निर्यातीचे मुख्य केंद्र बनू शकते.” त्यांनी कोल्हापूरच्या आयटी कंपन्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘एसईपीसी’कडून ‘हँडहोल्डिंग सपोर्ट’ देण्याची ग्वाही दिली.

थेट संवाद आणि विचारमंथन

खुल्या चर्चासत्रात सायबर सिक्युरिटी, डेटा गव्हर्नन्स आणि केंद्र सरकारच्या ‘MAI’ अनुदान योजनेवर सविस्तर प्रश्नोत्तर झाले. कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे (DIC) महाव्यवस्थापक श्री. अजयकुमार पाटील यांनीही ‘आयटीएके’च्या कार्याचे कौतुक केले.

‘आयटीएके’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आयटीएके’च्या संपूर्ण कार्यकारी समितीने (EC) दिवस-रात्र परिश्रम घेतले.

प्रताप पाटील (अध्यक्ष, ITAK): “आज ‘एसईपीसी’च्या महासंचालकांचा हा दौरा म्हणजे आपल्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या क्षमतेवर उमटलेली राष्ट्रीय मोहोर आहे. कोल्हापूरला देशातील एक प्रमुख ‘आयटी हब’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
२. राहुल मेंच (सचिव, ITAK): “भारत-अमेरिका व्यापार पोर्टलवर असलेली तांत्रिक त्रुटी ‘आयटीएके’च्या लढ्यामुळे दूर झाली असून, हा केवळ कोल्हापूरचा नाही, तर देशाचा विजय आहे.”

Related posts

वाचकांच्या मतांना आमचे प्राधान्य; सहभागी व्हा ‘या विशेष सर्वेक्षणात Readers Opinion Poll for Better News

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar