सातारा – जिल्ह्यातील स्वागत फाऊंडेशनतर्फे कै. शामराव भिसे (गुरुजी) राज्यस्तरीय वाड्मयीन पुरस्कार २०२२ साठी विविध साहित्य प्रकारातील साहित्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी
कथा, कविता, कादंबरी, नाटक, समिक्षा, बालसाहित्य, ललित, वैचारिक आणि इतर सर्व साहित्य प्रकारातील साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती सूर्यकांत शामराव भिसे यांनी दिली आहे.
या पुरस्कारासाठी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या दोन वर्षात प्रकाशित झालेले साहित्य ग्राह्य धरले जाणार आहे. पुरस्कारांची घोषणा फेब्रुवारीमध्ये करण्यात येतील व पाटण येथे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असेल, असे श्री भिसे यांनी सांगितले.
पुस्तकाच्या दोन प्रती, लेखकाचा अल्प परिचय आणि पासपोर्ट साईज दोन फोटो १५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा रितीने स्वागत फाऊंडेशन, सूर्यकांत शामराव भिसे, मु, सातेवाडी, पो. नाटोशी, ता. पाटण जि. सातारा. पिन- 415206 संपर्क – 9881360334, 9890550962 यावर पाठवण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.