March 23, 2025
Air filter developed to kill germs New research
Home » जंतू नष्ट करणारे ‘एअर फिल्टर’ विकसित
संशोधन आणि तंत्रज्ञान

जंतू नष्ट करणारे ‘एअर फिल्टर’ विकसित

हवेतून होणारे संक्रमण कमी करू शकणारे एक नाविन्यपूर्ण, हरित, नवीन प्रतिजैविक एअर फिल्टर तंत्रज्ञान

नव्याने विकसित करण्यात आलेले एअर फिल्टर सामान्यत: ग्रीन टीमध्ये आढळणाऱ्या घटकांचा वापर करून जंतूंना ‘स्वयं-स्वच्छता’ प्रणालीद्वारे निष्क्रिय करू शकते.

शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार, अशुद्ध हवेमुळे आपले आयुष्य कमी होऊ शकते. हवेतील दूषित घटकांमुळे श्वसन रोग होतात. याचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे भारतीयांचे आयुष्य 5-10 वर्षांपर्यंत कमी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय विज्ञान संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू (IISc), बंगळुरू येथील प्राध्यापक सूर्यसारथी बोस आणि प्राध्यापक कौशिक चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने जंतू नष्ट करणारे ‘एअर फिल्टर’ विकसित केले आहे. हे एअर फिल्टर सामान्यतः ग्रीन टीमध्ये आढळणारे ‘पॉलीफेनॉल’ आणि ‘पॉलीकॅटीओनिक पॉलिमर’ सारख्या घटकांचा वापर करून जंतू निष्क्रिय करू शकते. हे ‘हरित’ घटक एका विशिष्ट बंधनाद्वारे सूक्ष्मजंतूंना क्षती पोहचवतात.

हे संशोधन आव्हानात्मक COVID-19 महामारीच्या काळात विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (SERB)ला देण्यात आलेले अनुदान, तसेच SERB-तंत्रज्ञान भाषांतर पुरस्कार (SERB-TETRA) द्वारे समर्थित होते. या संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

सतत वापरामुळे, सध्या वापरले जात असलेले एअर फिल्टर्स त्यात अडकलेल्या जंतूंचे प्रजनन स्थळ बनतात. या जंतूंच्या वाढीमुळे फिल्टरची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे फिल्टरचे आयुष्य कमी होते. या जंतूंच्या पुनरुत्पादनामुळे परिसरातील लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. राष्ट्रीय चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळा मान्यता मंडळ (एनएबीएल) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत या नवीन प्रतिजैविक एअर फिल्टरची चाचणी घेण्यात आली असून हा एअर फिल्टर 99.24% च्या कार्यक्षमतेसह SARS-CoV-2 (डेल्टा प्रकार) निष्क्रिय करु शकत असल्याचे आढळून आले आहे. हे तंत्रज्ञान AIRTH या स्टार्ट अपकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. हे स्टार्टअप व्यावसायिकरणाच्या हेतुने सध्याच्या जंतू-उत्पादक एअर फिल्टर्सच्या जागी जंतू नष्ट करणारे एअर फिल्टर्स वापरणार आहे.

या नवकल्पनेमध्ये हवेतून पसरणाऱ्या रोगजंतूमुळे होणारे स्थानिक रोग रोखू शकतील असे प्रतिजैविक फिल्टर विकसित करण्याची ग्वाही देण्यात आली होती, म्हणूनच 2022 मध्ये याचे पेटंट मंजूर करण्यात आले. आपल्या एसी, सेंट्रल डक्ट आणि एअर प्युरिफायरमधील हे नवीन फिल्टर्स हवेच्या प्रदूषणाविरुद्धच्या आपल्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात तसेच प्रदूषण आणि कोरोनाव्हायरस सारख्या हवेतील रोगजंतूंचा प्रसार कमी करु शकतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading