‘कुंडल- कृष्णाई प्रतिष्ठान तर्फे विविध साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंतराव जगदाळे यांनी दिली आहे.
कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या प्रकारातील पुस्तकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे असून मान्यवर परिक्षकांकडून पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. तरी यासाठी पुस्तके पाठवण्यात यावीत, असे आवाहन श्री. जगदाळे यांनी केले आहे.
१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २० २२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. तरी लेखक व प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती ३१ जानेवारी २०२३ पूर्वी श्री हणमंतराव कुडलीकराव जगदाळे (निवृत्त पोलिस उपअधीक्षक ), ज्योतिबाचा माळ, मु . पो. कुमठे. ता. कोरेगाव, जि . सातारा. पिन कोड – ४१५५०१ या पत्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9765988993 किंवा मो.9823174802 यावर संपर्क साधावा.