महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे यांनी दिली आहे.
कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रहासाठी सुमनताई पंचभाई स्मृती पुरस्कार, कथा संग्रहास मीराबाई गोराडे स्मृती पुरस्कार, कादंबरीसाठी शिलाताई गहिलोत-राजपूत पुरस्कार, बालसाहित्यासाठी डॉ. राहुल पाटील स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम १००१ रुपये व सन्मान चिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
ज्या कवी अथवा लेखकांचे ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी) या साहित्य प्रकारात पुस्तक प्रकाशित झालेले आहे अशा कवी अथवा लेखकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रकाशित पुस्तकाच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ०५ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन साहित्यकणा फाऊंडेशनने केले आहे.
साहित्य पाठवण्यासाठी पत्ता असा – विलास पंचभाई (सचिव), साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरीरोड, नाशिक – ४२२००१. अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
3 comments
साहित्यिक, राजकीय, सामाजिक असे सर्वगुणसंपन्न पोर्टल
साहित्यिक सामाजिक असे सर्वगुणसंपन्न पोर्टल,
धन्यवाद मनःपुर्वक नमस्कार