July 21, 2025
Rainfall forecast map for Maharashtra (21 to 28 July 2025) – prepared by Meteorologist Manikrao Khule (Retd), IMD Pune
Home » आजपासून पावसाची शक्यता !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजपासून पावसाची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मध्यम ते जोरदार पाऊस –

सोमवार दि. २१ जुलै ( लहान एकादशी) पासुन आठवडाभर म्हणजे पहिला श्रावणी सोमवार दि. २८ जुलैपर्यन्त महाराष्ट्रातील 👇 मुंबईसह संपूर्ण कोकण (विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अश्या ३ जिल्ह्यात), संपूर्ण विदर्भ (विशेषतः अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ अश्या ८ जिल्ह्यात) तसेच 👇 नाशिक, नगर, पुणे, सातारा  जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात  तसेच👇 नंदुरबार ,जळगांव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी अश्या १० जिल्ह्यात👇 म्हणजेच एकूण बत्तीस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

आता तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस-

                 मराठवाड्यातील 👇 छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटा खालील वर्षच्छायेच्या प्रदेशातील👇  नाशिक, नगर, पुणे, सातारा  जिल्ह्यातील तालुक्यात २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

जुलै महिन्याचा अंदाज व सध्यस्थिती –

                 दि. ११ ते २४ जुलै दरम्यानच्या दोन आठवड्यात कोकण व विदर्भ वगळता संपूर्ण खान्देश, मध्य- महाराष्ट्र व मराठवाडा अश्या एकूण १८ जिल्ह्यात अंदाजानुसार तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस वजा जाता उघडीपच जाणवत आहे. परंतु त्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजे उद्या सोमवार दि २१ जुलै पासुन पावसाचे वातावरण होत आहे.
                 जुलै महिन्यात, महाराष्ट्रासाठी, सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाचा अंदाजाची पूर्तता, येणाऱ्या १० दिवसातील, मध्यम ते जोरदार पावसामुळे होण्याची शक्यता जाणवते.

नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरणे संचय साठा स्थिती-

                सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी,  गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा – कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती नद्यांच्या खोऱ्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीतही ह्या २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे नजीकच्या काळात जायकवाडी धरणही त्याच्या शतकी जलसाठ्याकडे झेपवण्याची शक्यता जाणवते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading