सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंत जगदाळे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनचा काळ असतानाही ग्रंथकारांनी या पुरस्कार स्पर्धेस भरभरून प्रतिसाद दिला. लॉकडाऊन संपल्यानंतर हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत, असेही जगदाळे यांनी सांगितले.
साहित्यकृतींना देण्यात आलेले पुरस्कार असे –
बालसाहित्य पुरस्कार
१ ) आकाशाचा चित्रकार – बालकाव्यसंग्रह, अंजली श्रीवास्तव
2) ग्रेट ग्रेट गेटा – चद्रकांत निकाडे
समीक्षा
१ ) पारंपारिक लोककला व लोक कलावंत – प्रा. आनंद गिरी
2 ) बाबाराव मुसळे -व्यक्ती आणि वाङमय– डॉ .सोपान सुरवसे
कादंबरी
१ ) लेकमात – विजय जावळे
2) वीजेने चोरलेले दिवस – संतोष जगताप
3) हे वयच असं असतं– संजय जाधव
४) महायोगिनी अक्क महादेवी– प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर
वैद्यकीय संशोधन
H D H D – डॉ. सतीश कुमार पाटील
ललित
१) आत्मप्रेरणा – लक्ष्मण जगताप
२) एकांताचे कंगोरे – मीनल येवले
कथासंग्रह
१) ब्रँड फॅक्टरी – मनोहर सोनवणे
२) कोलाज– संगीता पुराणिक
३) मातेरं – डॉ कृष्णा भवारी
४) शिकार– प्रा. डॉ. युवराज पवार
५) भाकरीची शपथ – बा.स. जठार