महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी खानवडीत होणार
दशऱथ यादव यांची माहिती
सासवड : सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे २८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे, उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या परिवाराचे वास्तव्य राहीलेल्या खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणाऱ्या या साहित्य संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक, कवींनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.