बापू तुमच्या स्वप्नातील भारत
आज तुमचा आदर्श विसरला धृ
बापू…
देशभक्त, हुतात्मा त्यागाने
स्वातंत्र्याचा पाया रचला
आज भ्रष्ट सफेद उंदरांनी
कुरतडल्याने पाया खचला
बापू तुमच्या स्वप्नातील भारत
आज तुमचा आदर्श विसरला धृ
बापू…
देशभक्ती, हुतात्मे, दांडीयात्रा
सारं अभ्यासापुरते राहिले
बापू नेत्यांचे घोटाळे, गुंडगिरी
पक्षांतर आज आम्ही पाहिले…..
बापू..
दुष्काळ, कर्जाने शेतकरी
आत्महत्या करत आहे
सत्तेच्या हिरव्या मळ्यात
नेते अधिकारी चरत आहे….
बापू….
मतदारांना बुजगावनं करुन
अच्छे दिनचे स्वप्न हिरावले
हायब्रीड उत्पादनाने युवापिढी
आज सकस आहाराला दुरावले
बापूं
तुमचा चष्मा स्वच्छतेचे प्रतीक
घाण, भ्रष्टाचार संपतच नाही
मनकी बाते मनातच राहून
प्रश्न मतदारांचे सुटतच नाही
बापू…
योजना लुटणारे बकासूर
आज जामिनीवर सुटत आहे
बापू लोकशाहीच्या झाडावर
बांडगुळांची वस्ती पसरत आहे..
कवी – माणिकराव गोडसे पाटील, नाशिक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.