आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495
१-परतीचा पाऊस –
अति वायव्य राजस्थान, व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार,सोमवार दि. २३ सप्टेंबर पासून. मान्सून परतण्याची शक्यता जाणवते. मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
२- मध्यम पाऊस –
सप्टेंबर २१ ते २४ च्या दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरवात प्रथमत: विदर्भात जोरदारपणे व त्या नंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खान्देश व नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
३-जोरदार पाऊस –
सप्टेंबर २६ ते २९ दरम्यानच्या च्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर, नगर, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार अति जोतदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
४-अतिजोरदार पाऊस –
त्यातही २६, २७ ला खान्देश नाशिक छ.सं.नगर व सभोंवतलातील परिसरात व २८, २९ ला मुंबई सह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
५-पूर- पाणी –
ह्याचं चार(२६ ते २९) दिवसात नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर- पाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
आजपासुन पाच दिवस शक्य तेवढ्या शेतमशागती व खरीप पीक काढणी कामाचा उरक व्हावा, असेही वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.