खामगाव – येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या वतीने दिले जाणारे २०२४ चे वैखरी राज्य साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये यंदा बाबा भांड यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य संजय पाटील आणि वैखरी राज्य साहित्य पुरस्कार समितीचे मुख्य संयोजक डॉ. सुनील पवार यांनी दिली.
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी नियुक्त निवड समितीने दिलेल्या निकालानुसार परभणीच्या गंगाधर गायकवाड यांच्या “धूळधाण” कांदबरीस सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्कार, धुळे येथील प्रविण पवार यांच्या “भूईलेक” कवितासंग्रहास प्राचार्य स्व. गो. पु. देशमुख स्मृती पुरस्कार, यवतमाळ येथील अनंता सूर यांच्या “कोंडमारा” कथासंग्रहास श्रीमती स्व. शालिनीताई देशमुख स्मृती पुरस्कार तर बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या “विहीरीची मुलगी” या बहुचर्चित साहित्यकृतीला कवी विशाल इंगोले स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कारार्थीना प्रत्येकी ११,००० रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सद्गुणराव देशमुख राहणार आहेत, अशी माहिती प्राचार्य संजय पाटील आणि वैखरी राज्य साहित्य पुरस्कार समितीचे मुख्य संयोजक डॉ. सुनील पवार यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.