कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, बंधुता काव्य पुरस्कार आणि समष्टी काव्य पुरस्कारासाठी आवाहन
सर्वोत्कृष्ट कवितेसाठी 31 जानेवारीपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन
मुंबई – मराठी साहित्यात प्रतिष्ठित ठरलेल्या नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, बंधुता काव्य पुरस्कार आणि समष्टी काव्य पुरस्कार असे तीन स्वतंत्र पुरस्कार सर्वोत्कृष्ट कवितेसाठी देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थही पारितोषिक देण्यात येणार आहेत.
मराठीतील उत्तम कविता शोधाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियम असे – कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कारासाठी दीड हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ, तर बंधुता पुरस्कारासाठी बाराशे रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ व समष्टी पुरस्कारासाठी एक हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यासाठी कवीने आपली एक उत्तम कविता 9321243925 या व्हाट्सअप नंबरवर 31 जानेवारी पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.
मराठीतील ख्यातनाम लेखक कवींतर्फे पुरस्कार योजनेचे परीक्षण केले जाईल. त्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप राहणार नाही. तसेच परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. कविता पाठविताना विषयाचे बंधन नाही. प्रवेश फी 200 रुपये असून 8237364353 (नीलम शिर्के) या गुगल नंबर वर प्रवेश फी पाठवावी. प्रवेश फी मिळाली का याची खात्री करूनच कविता पाठवावी असे आवाहन करण्यात आले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
