निर्मला मठपती फाउंडेशनचे २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर
सोलापूर – येथील निर्मला मठपती फाउंडेशन ही संस्था दरवर्षी विविध वाङमय प्रकारांना पुरस्कार देत. २०२४ च्या पुरस्कारासाठी कादंबरी, ललितलेखसंग्रह, बालकथासंग्रह/ बाल कादंबरी या वाङमय प्रकारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. पुरस्कारासाठी पाठवलेल्या साहित्यकृती परीक्षकांकडून पाहाणी करून त्यातील निवडक पुस्तकांना पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवांजली स्वामी दिली आहे.
संस्थेच्यावतीने देण्यात आलेले साहित्य पुरस्कार असे –
कादंबरी विभाग :
प्रथम क्रमांक: “सांबादित्य”
(लेखिका: अर्चना देव, बुलढाणा)
द्वितीय क्रमांक: “डोईचा पदर आला खांद्यावरी”
(लेखिका: छाया महाजन, संभाजीनगर)
विशेष उल्लेखनीय साहित्यकृती:
“हिडन मेजरमेंट”
(लेखक: गोविंद काळे, सोलापूर)
“विठाईची कान्हाई”
(लेखिका: आरती काळे, अक्कलकोट)
ललितलेख विभाग:
प्रथम क्रमांक: “हिरवाई धून”
(लेखिका: डॉ. सुनिता चव्हाण, मुंबई)
द्वितीय क्रमांक : “आनंदनिधान”
(लेखक: विश्वास देशपांडे, चाळीसगाव)
विशेष उल्लेखनीय साहित्यकृती: “अक्षरांची रांग”
(लेखक: रामचंद्र इकारे, बार्शी)
बाल कथा/ कादंबरी :
प्रथम क्रमांक: “झाड एक मंदिर”
(लेखिका: स्वाती कान्हेगावकर, नांदेड)
द्वितीय क्रमांक: “अरेच्या.. खरंच की!”
(लेखिका: स्मिता बनकर, नाशिक)
विशेष उल्लेखनीय साहित्य कृती: “खुशाल चेंडू”
(लेखक: आबासाहेब घावटे, बार्शी)
पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असून रविवारी (10 नोव्हेंबर 24 रोजी ) “शिव स्मारक”, सोलापूर, येथे दुपारी साडेतीन वाजता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.