March 23, 2023
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » राजकिय फुलबाज्या…
व्हायरल

राजकिय फुलबाज्या…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या

निवांत ( हर्षवर्धन पाटलांचे वक्तव्य )

घरजावई झाल्या पासनं
माझा हात तुपात आहे |
ईडी नाही चौकशी नाही
कारण ‘ भा’ जपात आहे ||

राजन कोनवडेकर

सहिस्नू ….

राजकारणात आम्ही सोडून
सगळे बेमान आहेत |
खादीच्या अजंठ्यावर मात्र
बाकी सारे समान आहेत ||

राजन कोनवडेकर

पुतना प्रेम

प्राप्तिकर नोटीसीआडून
विरोधकांचा गेम करतंय |
पवार म्हणतात केंद्र सरकार
विशेष आपल्यावर प्रेम करतंय ||

राजन कोनवडेकर

Related posts

सहिंस्नू….

राज ठाकरे यांचे वाळूशिल्प…

राजकिय फुलबाज्या

Leave a Comment