“शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या “शोध स्त्रीवादी संकल्पनेचा” या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले.
प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. इंगोल्या म्हणाल्या, स्त्री चळवळीला आज पन्नास वर्ष पूर्ण होताहेत. याच दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हा पण एक योगायोग आहे. ह्या सुवर्णयोगावर स्त्री वादी चळवळीबद्दल आत्मीयता असणाऱ्या आणि त्यावर आस्थापूर्वक काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे विमोचन संपन्न झाले हा आणखी एक अमृतयोगच म्हणावे लागेल.
डॉ. प्रतिमा इंगोले ह्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत. आपल्या या निरीक्षणाचे सर्व कौशल्य पणाला लावून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. हा ग्रंथ प्रकाशित करताना सुजाता देशमुख, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक मा. गिताली वि. म., प्रशासकीय अधिकारी अंजली धमाल, त्यांच्या सहकारी आणि इतर अभ्यासक उपस्थित होते. विशेष म्हणजे पुरुष उवाच अभ्यासवर्गात ह्या ग्रंथाचे प्रकाशन झाले हा आणखी अमृततुल्य योगायोगच ठरला. सर्वांनी ग्रंथाचे स्वागत करून हा ग्रंथ अभ्यासक व सामान्य वाचक ,ग्रामीण व शहरातील स्त्रियां तसेच शिक्षक ह्यांना उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
