शिंगाडा ही पूर्व आशिया, आग्नेय आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ही पाणथळ जागी वाढणारी वनस्पती आहे. याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. याचे कंद खाद्य समजले जातात. दोन सेंटिमीटर जाडीचे मऊ गर असलेल्या शिंगाड्याच्या फळाची चव किंचित गोड असते.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क
कोल्हापूर, 9623895866
शिंगाडा
शास्त्रीय नाव: Eleocharis dulcis , इलेओकरिस डल्सिस;
इंग्लिश नाव : water chestnut, वॉटर चेस्टनट
शिंगाड्याचे फायदे –
शिंगाडा हे फार गुणी फळ आहे. त्याचे पीठ रुचकर लागते. उपवासासाठी शिंगाडा उत्तम आहे.
शिंगाड्यात व्हिटॅमिन B6 असल्यामुळे ऊर्जा मिळते.
यात आयोडीन असल्यामुळे थायरॉईड पेशंट साठी खूप उपयोगी आहे.
यात भरपूर पाणी असतं ( शिंगड्याला पानीफल म्हणतात) त्यामुळे डीहायड्रेशन होत नाही.
शिंगड्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहींनी खायला हरकत नाही.
पोटॅशियम, झिंक ,मॅग्नेशियम युक्त शिंगाडा हृदय रोग्यांनी नक्की खावा.
शिंगड्यातील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा चमकदार होते आणि मऊ राहते.
असा हा शिंगाडा ,पहा बरं गुणी आहे केवढा !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.