September 7, 2024
Home » यशाचा पासवर्ड – जनसंपर्क
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

यशाचा पासवर्ड – जनसंपर्क

दांडगा जनसंपर्क हे सध्याच्या काळातील यशाचे एक उत्कृष्ठ परीमाण बनले आहे. आपण आपल्या जिवनात जेवढी माणसे जोडाल तितकी यशाची खात्री वाढते हा नव्या काळाचा नवा मंत्र आहे. केवळ पुस्तक  वाचण्यापेक्षा आजुबाजुची माणसे वाचता यायला हवीत, त्यांच्याशी हतगुज साधता यायला हवे, लोकसंग्रह वाढवता यायला हवा,तेव्हाच प्रत्येक माणसाच्या अंगी असलेल्या प्रचंड क्षमतांची जाणीव आपल्याला होइल व त्या क्षमताचा प्रभावी वापर करुन प्रत्येकाला अपेक्षीत उद्धीष्ठ सहज गाठता येइल. कारण प्रभावी जनसंपर्क हाच बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे.  

रविंद्र खैरे,  r.s.khaire@gmail.com

स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणारे किंवा स्पर्धेत स्वतःचे वेगळे अस्तीत्व निर्माण करु पाहणारे बरेच तरुण स्पर्धेची लढाइ एकटेच लढत असताना दिसतात. अगदी पहील्या दिवसापासुन आपला वेगळा स्वतःचा एक कोष तयार करुन त्यातच स्वतःला जखडुन घेण्याकडे अनेकांचा ओढा असतो. बाहेरील जगाशी कामापुरता संपर्क ठेवावा व एरव्ही आपण आपल्याच विश्वात रममाण राहुन अभ्यास करीत राहवे अशी सवय काहीनी स्वतःला लावुन घेतलेली असते. काही अंशी हे तंत्र बरोबर असले तरी हमखास यशासाठी एकमेका सहाय्य करु हे ब्रीद अंगिकारलेच पाहीजे. स्वतःच्या कोशातुन बाहेर पडुन एकाच ध्येयाकडे वाटचाल करणार्‍याचा शोध घेता आला पाहीजे. अशा समविचारी लोकांना बरोबर घेता आले, त्याच्याकडील ज्ञानाचा,क्षमतांचा,विवीध तंत्राचा खुबीने वापर करता आला तर आपल्याला व इतरांनाही मिळणार्‍या यशाची शक्यता कैक पटीने वाढते.

जनसंपर्क म्हणजे काय?

माणसे जोडण्याची कला म्हणजे जनसंपर्क होय. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आजुबाजुच्या लोकांशी दररोज संपर्क येत असतोच फक्त काहीच जण आपल्या आजुबाजुच्या लोकांना हाताळण्याचे, त्याच्याशी संपर्क वाढवण्याचे व लोकांच्या ज्ञानाचा, अनुभवचा फायदा करुन घेण्याचे  कौशल्य विकसीत करतात. असे करताना आपल्याही ज्ञानचा व अनुभवचा फायदा समोरील व्यक्तीला होउन त्याचाही सर्वांगीन विकास होइल याची काळजी घेतली जाते. यामुळे माणसांचा लोकसंग्रह वाढुन स्पर्धेच्या युगात आपल्याला हवे असलेले यश अशा लोकसंग्रहाच्या बळावर मिळवता येते. म्हणुन तर सध्याच्या काळात माणसांच्या इतर स्थावर व जंगम संपत्ती इतकीच कींमत त्याच्या जनसंपर्काला दिली जाते आहे. कार्पारेट जगात तर माणसाचा जनसंपर्क उमेदवाराची निवड करताना सर्वात प्रथम अभ्यासला जातो.

जनसंपर्क कौशल्याचे महत्वः

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणानी जाणीव पुर्वक या जनसंपर्क कौशल्य अंगी बानवले तर याची मधुर फळे नक्कीच चाखायला मिळतील. कारण आज स्पर्धा परीक्षेचे स्वरुप अत्यंत व्यामिश्र स्वरुपाचे झालेले आहे. या बदलत्या स्वरुपामुळे अनेक तरुण गोंधळुन गेलेले आढळतात. अशा परिस्थीतीत जर तुमचा जनसंपर्क चांगला असेल तर अनेक जुन्या जाणत्या लोकांची तुम्हाला सहज मदत घेता येउ शकते. अनुभवी व्यक्तीचे सल्ला व मार्गदर्शन आपल्याला अभ्यासाची नवी उर्जा देते. या क्षेत्रातील लोकांच्या जितक्या जास्त ओळखी तेवढे स्वतःचे कष्ट कमी होतात. मग संदर्भ साहीत्य असो असो वा बदलेला अभ्यासक्रम, मुलाखती विषयी सल्ला असो वा पेपर सोडवण्याच्या टेक्नीक, परीक्षेच्या तारखा असो वा नैराश्येतुन बाहेर पडण्याचे मार्गर्द्शन अशा अवघड वळणावर आपल्याला ओळखीचा एखादा नक्की भेटतोच जो आपल्याला जन्मभर पुरेल इतके देउन जातो. हे केवळ जनसंपर्कामुळेच शक्य होते. म्हणुन स्पर्धेत उतरलेल्या स्पर्धकांने आपला जनसंपर्क एखदा नक्कीच तपासुन पाहायला हवा. या कौशल्यात आपण कमी पडत असु तर तो वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायाला हवा.

चला जनसंपर्काची कला शिकुयाः

  • · जनसंपर्क वाढवण्यासाठी सतत माणसाच्या मागे फिरावे लागते हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण दैनदीन अभ्यासात व्यत्यय येउ न देताही जनंसपर्क वाढवु शकतो.
  • · आपल्याला आपले ध्येय स्पष्ट माहीती हवे त्यासाठी आपल्याला कोण मदत करु शकतो याची जाणीव हवी,कोणत्या व्यक्तीशी संपर्क वाढवायचा नाही हे  अगोदरच ठरवायला हवे.
  • · या बाबी नक्की झाल्या असतील तर आपण जनसंपर्क नक्की वाढवु शकता.काही सवयी आपण स्वतःला लावुन घ्या आणि जादु बघा.
  • ·  त्या सवयी मध्ये सतत हसरा चेहरा असावा. कोणीही एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचे तोंड भरुन कौतुक करावे,
  • · आपल्या मित्राशी, नातेवाइकशी, शिक्षकांशी बोलताना अगर वागताना आपली काही चुक झाली तर मोठ्या मनाने स्वारी म्हणा
  • · कोणाशीही जलस न होता कर्तृत्वाचा सन्मान करा, दुसर्‍याला माफ करायला शिका.
  • · लोकांच्या वाढदिवसाला व इतर सण संमारंभा मनापासुन शुभेच्छा द्या. आपले चालणे,बोलणे, व वागण्यात जिव्हाळा आला की तुम्ही या जगातील सर्वात मोठा चुंबक होता ,व अनेक लोकांना तुम्ह्च्या कडे खेचुन घेता येते.
Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
 https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उभारला बेकरी उद्योग…

तडजोड की संघर्ष

स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading