November 30, 2022
Home » मुलाखतीला सामोरे जाताना…
करिअर अन् स्पर्धा परिक्षा

मुलाखतीला सामोरे जाताना…

विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते. 

– रवींद्र खैरे (करिअर सल्लागार)

स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी व यश यांच्यामधली पायरी म्हणजे मुलाखत. याच पायरीवरून यशाच्या सिंहासनापर्यंत पोहोचता येते. विद्यार्थ्याच्या ज्ञानापेक्षा त्याचा दृष्टिकोन, काम करण्याची तळमळ समाजाप्रती असलेली भावना, त्यांचे गुण  – अवगुण व पात्रता, तपासणारी महत्त्वाची प्रक्रिया असते मुलाखत. एका रात्रीत झिरो असलेल्या विद्यार्थ्याला हिरो बनण्याचे सामर्थ्य मुलाखतीत असते. म्हणून मुलाखतीला सामोरे जाताना पात्रता असणारेही अनेकजण प्रचंड तणावात असतात. हा तणाव ज्याला हाताळता येतो असेच तरुण इतिहास घडवतात.

 विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते. मुलाखतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक समज -गैरसमज ही असतात. काहींच्या मनात अनावश्यक भीतीही असते. क्षमता असूनही केवळ भीतीपोटी संपूर्ण मुलाखत गोंधळात पार पडल्याने हातातोंडाशी आलेला पदाचा घास गेल्याची अनेक उदाहरणेही आहेत.

कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/

ज्यांना मुख्य परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी मुलाखतीची लवकरच तयारी सुरू करावी. संभाव्य प्रश्नांशी यादी तयार करून आपल्या जवळच्या शिक्षकांना अथवा तज्ञ व्यक्तीला प्रश्न विचारायला सांगावे अशी रंगीत तालीम केल्यास मुलाखतीचे टेन्शन काही प्रमाणात दूर व्हायला मदत होते . समोरच्यांना प्रभावित करण्यासाठी इंग्रजीत मुलाखत देण्यापेक्षा मातृभाषेतून आपण चांगले सादरीकरण करू  शकत असाल तर तसे पॅनलला अगोदरच कळवावे. लक्षात ठेवा मुलाखत ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्याच्या दृष्टिकोनाची असते त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे बरोबर आली पाहिजेत असा अट्टाहास धरून आदर्श उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका अथवा थापा मारु नका कारण मुलाखत घेणारी व्यक्ती मानसशास्त्रातील तज्ञ असू शकते.

प्रशासकीय सेवेसाठी मुलाखत घेणारी तज्ञ व्यक्ती उमेदवारांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍याचे गुण अथवा पात्रता आहे का हे शोधत असते. त्यासाठी ज्ञानाबरोबरच परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला, समस्या मांडणाऱ्या पेक्षा निराकरण करण्याची क्षमता, सोबतच्या व्यक्तींना बरोबर घेऊन जाण्याची तयारी, सरकारी पैशाचा योग्य विनियोग करण्याची दृष्टी, आमिषाला बळी न पडण्याची उमेदवाराची पात्रता, वैयक्तिक हितापेक्षा समाजहिताला महत्व देण्याची वृत्ती, धडाडीपणा, कामाची तळमळ, कर्तव्याशी तादात्म्य पावण्याची वृत्ती, असे गुण व क्षमता तपासण्यासाठी विविध आडवेतिडवे प्रश्न तज्ञ मुलाखतकाराकडून  विचारले जातात. सध्या युट्युब वर अशा अनेक मुलाखतींचे व्हिडिओज उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी ते जरूर पहावेत. 

मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.freewebs.com/mounimaharaj/

मुलाखतीला सामोरे जाताना ही काळजी घ्या

१. प्रशासकीय सेवेतील मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी मुलाखत तंत्राचा बारकाईने अभ्यास करावा त्यासाठी अगोदर मुलाखत दिलेल्या विद्यार्थ्यां चा अथवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

२. सुरवातीचे बरेचसे प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भात असू शकतात उदाहरणार्थ विद्यार्थ्याचे नाव आणि त्या नावाशी संबंधित मोठी व्यक्ती व तिचे कार्य. विद्यार्थ्यांची आवड. त्याचा सामाजिक दृष्टिकोन, आपल्या राज्याचा इतिहास, राजकारण, समाजकारण.

3. बऱ्याच मुलाखतीमध्ये जर  हे असे घडले तर आपण काय कराल असे प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांची उत्तरे देताना तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात अशी कल्पना करून प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या सर्व उत्तरामध्ये समाजहित हाच गाभा असला पाहिजे.

४. मुलाखत  देताना तुमची सकारात्मकता दिसली पाहिजे.ठाम भूमिका जाणवली पाहिजे. आपले ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोण, चांगल्या सवयी व वृत्ती आपल्या  संभाषणांमधून व्यक्त झाल्या पाहिजेत. तरच यशाचे दार आपल्यासाठी उघडू शकते.

Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

Related posts

यशाचा पासवर्ड – जनसंपर्क

Neettu Talks : व्यक्तीमत्वात कशाप्रकारे सुधारणा घडवायची…

बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव

Leave a Comment