वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2021-2022 करिता जाहीर आवाहन .
साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर तर्फे सन २०२३ पासून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. अशा या विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या संदर्भात जाहीर आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती युवराज कदम यांनी दिली.
या पुरस्कारासाठी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत निर्मित ग्रंथ/पुस्तके ग्राह्य असतील. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे साहित्यिक पुरस्कार यासाठी प्रवेशिका मागविण्यात येणार नाही. त्यासंदर्भात निवड प्रक्रिया वाचनकट्टा निवड समिती करेल.
पुरस्कार दरवर्षी मार्चच्या अखेरीस घोषित करण्यात येतील व एप्रिलमध्ये समारंभपूर्वक पुरस्कार वितरण सुद्धा करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र/सन्मानचिन्ह व पुस्तके/रक्कम असे असेल. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, गाैरवग्रंथ, समीक्षा व वैचारिक लेखन, दिवाळी अंक यासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२३ ही आहे.
देण्यात येणारे पुरस्कार असे :
√ उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार
√ उत्कृष्ट पद्य साहित्य पुरस्कार
√ उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार
√ उत्कृष्ट संशोधन साहित्य पुरस्कार
साहित्य पाठविण्याचा पत्ता – वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, फ्लॅट नं. ३, आनंदी-विजय अपार्टमेंट, माऊली चाैक, राजारामपुरी १३वी गल्ली, देसाई किराणा स्टोअर्स समोर, कोल्हापूर – ४१६ ००८ अधिक माहितीसाठी संपर्क नं – 9422138237
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.