July 20, 2025
आजीच्या रानभाज्यांमध्ये अमृतासमान गुळवेल व शेवळी – पारंपरिक औषधी उपयोग व पाककृतींची ओळख जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडून.
Home » आजीची भाजी रानभाजी – अमृतासमान गुळवेल…
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – अमृतासमान गुळवेल…

आजीची भाजी रानभाजी – अमृतासमान गुळवेल…

‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आज गुळवेल..

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात.

गुळवेल एक बहुपयोगी औषधी वनस्पती आहे. वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली अशी स्थानिक नावे आहेत. हिंदीत गिलोय तर संस्कृतमध्ये गडुची किंवा अमृता नावाने ओळख आहे. ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. पित्तवृध्दीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे. वारंवार मूत्र वेग तसेच प्लीहा वृद्धीत उपयुक्त. कुष्ठ व वातरक्तविकाराही उपयुक्त.

गुळवेलीची भाजी मंदावलेले पचन, पित्त, अपचन यावर उपयुक्त. भूक वाढवते आणि शरीराला शक्ती देते. कोणत्याही प्रकारचा ताप कमी करण्यास मदत करते. कावीळ कमी होण्यास मदत होते. मधुमेहींसाठी साखरेची पातळी नियंत्रित करते आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा कमी करते. नेहमीच्या सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी. रक्तातील दोष कमी करून त्वचेचे विकार बरे करण्यास मदत करते. कामाचा ताण आणि शारीरिक थकवा दूर करते.

गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. गरम तेलात चिरलेला कांदा व लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर चिरलेली गुळवेलीची भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading