‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०२४ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन
सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०२५ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी कथासंग्रह/ललितसंग्रह; कादंबरी, कवितासंग्रह या तीन विभागात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ३ पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती लेखक, कवी अथवा प्रकाशकांनी पाठवाव्यात. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. संबंधित साहित्यिकांनी ५ जानेवारी २०२५ पर्यंत पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन डॉ. स्वामी यांनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता असा :
अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा – इस्लामपूर,
राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, दिवाण बंगल्याजवळ,
इस्लामपूर, ता. वाळवा, जिल्हा सांगली. पिन – 415 409.
संपर्क – 9511837879, 9923683773.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.