चांदोलीतील निसर्ग पर्यटन 2022-23 चा प्रारंभ झाला आहे. फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान प्रवेशाची परवानगी आहे. ( सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत). त्या निमित्ताने या अभयारण्याची वैशिष्ट्ये याबाबत…
अजितकुमार पाटील
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्टे…
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकुण सहा व्याघ्र प्रकल्पापैकी चौथा प्रकल्प म्हणून चांदोली प्रकल्प 5 जानेवारी 2010 रोजी अधिसुचित झाला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील (सह्याद्री) एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न व अतिसंवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटाचा भाग असल्यामुळे वाघांच्या अधिवासाबरोबरच विविध प्रकारच्या वन्यजीवांची विविधता व प्रदेशनिष्ठ प्रजातींची विपुलता असणारे अत्यंत महत्वाचे क्षेत्र म्हणून महत्व आहे.
- पश्चिम घाटातील सर्वात उत्तरेचा व्याघ्र अधिवास म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास विशेष महत्व आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यात आणि आठ तालुक्यात येते.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान या दोन संरक्षीत क्षेत्रांचा समावेश होतो.
- सद्यस्थितीत गाभा क्षेत्रामध्ये 08 गावे, तर बफर अथवा परिघीय क्षेत्रामध्ये 85 गांवे आहेत.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्यातून वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयना धरण (शिवसागर जलाशय) तर चांदोली राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या वारणा नदीवर चांदोली धरण (वसंतसागर जलाशय) आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून कोयना नदी, वारणा नदी, या प्रमुख नद्या तर रामनदी, कांदाट नदी, मोरणा नदी, वांग नदी, केरा नदी, तापना नदी, सोळशी नदी, काजळी नदी, इत्यादी उपनद्या वाहतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे जंगल हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणास पाणी पुरवणारे जंगल आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगलामुळे या नद्या व धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे संरक्षण होत आहे.
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व महाराष्ट्राच्या भव्य इतिहासाची साक्ष देणारे प्रचीतीगड, भैरवगड, जंगली जयगड, व्याघ्र गड ( वासोटा), महिमंडणगड हे किल्ले आहेत.
युनेस्कोने घोषित केलेले “जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ”.
- जगातील जैव विविधतेचा “Hottest Hotspot” (जगातील 34 व भारतातील 4 Hottest Hotspot पैकी एक)
- महत्वाचे पक्षीक्षेत्र (Important Bird Area) Birdlife International या आंतरराष्ट्रीयसंस्थेने घोषित केलेल्या भारतातील 465 क्षेत्रापैकी एक.
- उत्तर पश्चिम घाटातील व सह्याद्री पर्वतातील एकमेव व्याघ्र प्रकल्प.
- पश्चिम घाटातील उत्तरेकडील शेवटचा व्याघ्र अधिवास.
प्रदेशनिष्ठ प्रजातीच्या संवर्धनाकरिता महत्वाचा व्याघ्र प्रकल्प.
कोयना धरण (105 TMC) व चांदोली धरण (35 TMC) या महाराष्ट्रातील मोठ्या दोन धरणाचे पाणलोटक्षेत्राच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्वाचा. मागील दोन वर्षात भारतात सर्वात जास्त नोंद झालेली पावसाची ठिकाणे या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येतात.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा इतिहास
- 16 सप्टेंबर 1985 = कोयना वन्यजीव अभयारण्याची अधिसुचना (कलम 18 व 19 अंतर्गत)
- 16 सप्टेंबर 1985 = चांदोली वन्यजीव अभयारण्याची अधिसुचना (कलम 18 व 19 अंतर्गत)
- सन 1993 = कोल्हापूर वन्यजीव विभाग अस्तित्वात आला.
- 12 मे 2004 = चांदोलीराष्ट्रीय उद्यानाची अधिसुचना (कलम35 अंतर्गत).
- 05 जानेवारी 2010 = सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अधिसुचना.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैविविधता
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटाच्या जैव भौगोलिक क्षेत्र 5B मध्ये येतो. संपूर्ण सहयाद्री व्याघ्र प्रकल्प डोंगराळअसुन, अतिशय तीव्र उतार, खोल दऱ्या व लांब पसरलेली लॅटरिटीक पठारे आहेत. सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचा मध्यवर्ती भाग कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाने आणि वारणा नदीच्या वसंत सागर जलाशयाने व्यापलेला आहे.
बहुतेक भागात घनदाट अर्धसदाहरीत जंगले आहेत. ज्यामध्ये विलक्षण विस्तृत वनस्पती आणि विविध प्रकारचे प्राणीतसेच विविध फुलांच्या प्रजाती व झाडेझुडूपे पसरलेली आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी 2000 ते 2500 मी.मी. पाऊस पडतो. लॅटराटीक पठरावर अनेक दुर्मिळ वनस्पती वाढतात.
सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळणारे विविध वन्यजीव व वनस्पतींच्या प्रजाती –
सस्तन प्राणी = 33, पक्षी = 244, फुलपाखरे = 120, उभयचर प्राणी = 22, सरपटणारे प्राणी = 44, गोडया पाण्यातील मासे = 50, वनस्पतीची विविधता = 1452, औषधी वनस्पतींच्या प्रजाती = 400, इत्यादी.
वैशिष्ट्यपुर्ण वन्यजीव अन् वनस्पती…
- महत्वाच्या वनस्पती : अंजनी, जांभुळ, हिरडा, गेळा, कुंभा, नरक्या, किंजळ, वेत, धूप.
- भक्षकप्राणी : वाघ, बिबट, रानकुत्रा, रानमांजर, ठिपकेवाले मांजर, बिबळ्या मांजर.
- भक्ष्यप्राणी: सांबर, गौर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, चौशिंगा, हनुमान वानर, लालातोंडी माकड, इ.
- इतर प्राणी : शेकरू, अस्वल, खवले मांजर, सालिंदर, रूडी मुंगूस, सामान्य मांजर, तपकीरी मुंगूस, इ.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.