April 1, 2023
konata-hangam-ha-poem-by-mandar-patil
Home » कोणता हंगाम हा…
कविता

कोणता हंगाम हा…

कोणता हंगाम हा
कोणती चढली नशा
धुंद झाल्या झाडवेली 
मोहरुन दाहीदिशा...

ही सुगंधी लाट आली 
कुठूनशी वाऱ्यासवे
सोहळा सजला ॠतूंचा 
अंबरी ताऱ्यासवे
चिंब झाल्या भुईस कुठली 
उरली नाही तृषा...

पाखरांच्या ओठी आले 
गूज ओले मखमली
डोंगराच्या पायथ्याला 
हिरवी नक्षी जन्मली 
आलं आभाळ ओथंबुनी 
गडद शुभ्र रेषा...

कवी - मंदार पाटील ( चैत्र ), 
कोल्हापूर, मोबाईल - 9049959637

Related posts

सातबारा…

‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शन

आई…

Leave a Comment