आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी.उंचीपासून ते पार साडेचार किमी उंचीपर्यन वरून खाली (व्हर्टिकली डाऊन) टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरडे वाऱ्यांचा झोता(जेट स्ट्रीम) चा पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे(हॉरिझॉनंटली लॅटरल)म्हणजे ३७ डिग्री उत्तर पासून ते पार १९ डिग्री उत्तर अक्षवृत्तपर्यंत रुंदावल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील खान्देश नाशिक मुंबई कुलाबा सांताक्रूझ पुणे ह्या शहरांचा पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा आज सोमवार दि. ९ डिसेंबर पहाटे ९ ते १४ डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री से. ग्रेड ने खालवला आहे.
शिवाय अति उंचीवरील वर दाखवलेल्या वाऱ्यांच्या झोताबरोबर जमीन पातळीवरही, समुद्र सपाटी पासून दिड किमी उंचीपर्यन्त, पाकिस्तानकडून वायव्य दिशेने येऊन महाराष्ट्रात पश्चिमी दिशा घेणारे थंड कोरडे वाहत आहे.
ह्या दोघांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्रात खान्देश नाशिककडून हळूहळू थंडी पडण्यास अपेक्षितपणे सुरवात झाली असुन पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.