December 7, 2022
Poem On Ahilyadevi holkar by Sunetra Joshi
Home » नमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..
कविता

नमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..

नमस्कार माझा…

हृदय सकल जनांचे जिने जिंकले
नमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..

सदैव केलीस तू शिवोपासना
सांभाळून राज्य अन प्रजानना
लोक कल्याणास्तव जीवन वाहिले…

तुझी दुरदृष्टी वाखाणावी किती
धैर्य विरता तुझ्यात तू बुध्दीमती
प्रजेलाच आपुल्या पुत्रवत मानले…

पती पुत्र सोडून तुला गेले जरी
दुःख लपविले किती स्वतःच्या उरी
कर्तृत्वाने दोन्ही कुळास उद्धारिले…

सती नाही गेलीस पतीमागुनी
जगलीस राष्ट्रासाठी जळत राहुनी
स्वसुखाला नेहमीच दूर सारले…

शिवोपासक म्हणुनी थोर भक्त तू
राष्ट्रहितासाठी गुणांनी किती युक्त तू
मारूनही जगात नाव अमर राहिले…

तुझे नाव वंदनीय म्हणून वाटते
तुझ्या पायी माथा मी सतत टेकते
तुझ्या प्रेरणेने राष्ट्रप्रेम मनी जागते…

Related posts

हिरवं पाखरू

कसे विसरू गतवर्षाला…

प्रेम चिरंतन…

Leave a Comment