शशिकांत हिंगोणेकर, मंदाकिनी पाटील, आबासाहेब पाटील, सरिता पवार, हर्षदा सुंठणकर, एजाज शेख, निशांत पवार यांचा साहित्यकृतींची निवड
डोंबिवलीः येथील काव्यरसिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या कै. अनिल साठ्ये स्मृति पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ठ कवितासंग्रह पुरस्कार कवी शशिकांत हिंगोणेकर यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती मंडळातर्फे प्रकल्प व्यवस्थापक हेमंत राजाराम व मंडळाच्या अध्यक्षा स्वाती ठाकुरदेसाई भाट्ये यांनी दिली आहे.
सर्वोत्कृष्ठ कवितासंग्रह पुरस्कारासाठी डॉ. प्रल्हाद देशपांडे, काव्यउन्मेष पुरस्कारासाठी कवी प्रवीण दामले, सर्वोत्कृष्ठ गझलसंग्रह पुरस्कारासाठी गझलकार जयंत कलकर्णी यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. पुरस्कारप्राप्त कवींना २६ फेब्रुवारी २०२३ आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त कवी असे –
कै अनिल साठ्ये स्मृति सर्वोत्कृष्ठ कवितासंग्रह पुरस्कार २०२३ कवी शशिकांत हिंगोणेकर यांना युद्धरत या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. २५०० रुपये,स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उल्लेखनीय कवितासंग्रहासाठी मंदाकिनी पाटील यांच्या आत्मपीठ तसेच आबासाहेब पाटील यांच्या घामाची ओल धरून या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. १००० रुपये, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कै अनिल साठ्ये स्मृति काव्यउन्मेष पुरस्कार २०२३ सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण व हर्षदा सुंठणकर यांच्या कपडे वाळत घालणारी बाई या पुस्तकांना विभागून देण्यात आला आहे. १००० रुपये, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कै अनिल साठ्ये स्मृति सर्वोत्कृष्ठ गझलसंग्रह २०२३ एजाज शेख यांच्या स्वच्छ हृदयाचे झरे व निशांत पवार यांच्या ऋतू माझ्या जिव्हाळ्याचे या पुस्तकांना विभागून देण्यात आला आहे. १२५० रुपये, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.