आर्क्टिक सर्कल मधील स्कँडेनेव्हियातील सामी जमातीबद्दल कमालीचे औत्स्युक्य वाटत होते. अगदी टोकांच्या हवामानात शतकानुशतके राहूनही ही जमात आजही टिकून आहे. रेंडियरचे कळप घेऊन दऱ्या-खोऱ्यांतून भटकायचे हे त्यांचे जीवन. कशी आहे त्यांची जीवनपद्धती, कुटूंब व्यवस्था, खाद्य संस्कृती ? जाणून घेऊया उणे २० ते उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात चक्क एका सामी कुटुंबात तीन दिवसांचा मुक्काम केलेल्या जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांच्याकडून…
स्कँडेनेव्हियातील विविध देशांना भेट देण्याचा योग आत्तापर्यंत तीन-चार वेळा आला. तेथील सर्वात जुन्या सामी जमातीचा उल्लेख बऱ्याचदा ऐकावयास मिळाला. तिथे हिवाळ्यात सहा महिने उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात व २४ तासांचा अंधार आणि उन्हाळ्यात चोवीस तासांचे सूर्यदर्शन…अशा परिस्थितीत आजही आपली वैशिष्ट्ये, चालीरिती जपणाऱ्या या जमातीबद्दल, पहिल्या भेटीपासूनच मोठी उत्सुकता व कुतुहल वाटत होते. सुदैवाने तेथील मुक्कामात या जमातीत राहण्याची, मिसळण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळेच त्यांची जीवनपद्धती, कुटूंबव्यवस्था, उद्योगधंदा याबाबत परिचय झाला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.