जगभरातील होणारी आपत्कालीन नैसर्गिक हानी, (भूकंपामुळे) होणारे नुकसान जसे की जैविक, नैसर्गिक, मानवी अथवा आर्थिक टाळता येणे शक्य होईल. म्हणून हा विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमात आला पाहिजे. तसेच अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थांच्या पातळीवर हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळणे आता काळाची गरज झालेली आहे. त्यादृष्टीने उपयुक्त व्हावे, अशी या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे.
महादेव सुबराव शितोळे
मुळातच विज्ञान क्षेत्रातील संशोधन हा माझा आवडीचा विषय. अकोळ येथे सहावीच्या वर्गात असताना शाळेतून दुपारी घरी परतत असताना विजेच्या गडगडाटांसह वादळी पाऊस वाटेवर आला व जवळच्या रेणुका मंदिराजवळ शेतात नारळीच्या झाडावर वीज कोसळली. तो क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. त्यानंतर विजेच्या अभ्यासाविषयी माझ्या मनात कुतूहल राहिले. तसेच शाळा शिकून नोकरीला गेलो तरी त्या विजेचे गारूड माझ्या मनात कायम होते.
पुढे १९९३ साली लातूर- किल्लारी भागात मोठा भूकंप झाला. यामध्ये मोठी जीवित व वित्त हानी झाली. अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याने त्या चष्म्यातून त्याकडे पाहू लागलो. माझे कुतूहल जागृत होऊ लागले. त्याची माहिती वेळोवेळी जमविणे आणि त्यावर चिंतन करण्यात मी गढू लागलो. यातून मी या विषयाच्या खोलात जाऊन नीट आकलन करून घेऊ लागलो. यातूनच मला जगभरातील भूकंप आणि त्याच्याशी संबंधित विषय समजून घेण्याचा, त्याच्यावरच्या उपाय योजनांचा अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली. मी म्हाडासारख्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास संस्थेत काम करत असल्याने मला भूकंप आणि गृहबांधणीत भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवर कशी मात करता येईल बांधकाम क्षेत्रात भूकंपरोधक तंत्र कसे वापरता येईल, याकडे माझे लक्ष वेधले जाऊ लागले. मी त्या विषयाचा अभ्यास करू लागलो. यातून माझा या विषयाचा अभ्यास झाला. त्यामुळे मी जगभरातील भूकंप: स्वरूप, भ्रम व वास्तव या पुस्तकाचे लेखन करू शकलो.
भूकंप हा टेक्नॉनिक प्लेटलेटस्, प्रेशर किंवा घर्षणामुळे होत नसून तो पृथ्वीच्या पोटातील किंवा गाभाऱ्यातील उत्सर्जित ऊर्जे (वाफ) मुळे मोलेक्युलर फ्युजन होऊन भूकंप होतात. टेक्नोनिक प्लेटलेटस् दबल्यामुळे उत्सर्जित वाफेमध्ये चार्जभरित पार्टिकल्स (धन व ऋण अणू) एकेमकांना घर्षणाने सांधल्याने पृथ्वीच्या पोटामध्ये विशिष्ट प्रकारच्या विजेचा प्रवाह तयार होतो. त्या बलशाली शक्तीमुळे भूकंप होतो. आकाशाच्या विजेशी तुलना करून पृथ्वीच्या पोटातल्या भूकंपाचा तुलनात्मक विचार करून सुमारे १० ते १२ कारणमीमांसांचा विचार या पुस्तकामध्ये मी मांडलेला आहे.
मुळातच भूकंप, त्याची कारणमीमांसा जाणून घेऊन त्याच्या परिणामाने जीवित हानी टाळणे, नैसर्गिक आपत्ती टाळणे हे योग्य ठरेल. म्हणून याचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकातील “भूकंपग्रस्तांना आधुनिक तंत्रज्ञान” व “भूकंपाबाबत जागरुकता हवी- गैरसमज नकोत ” या विभागामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे. भारतातील उच्च शासकीय शैक्षणिक अथवा नोंदणीकृत सामाजिक, शिक्षण संस्था तसेच संशोधक भू-वैज्ञानिक व भूगर्भीय उच्च तांत्रिक प्रयोगशाळा यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जेणेकरून जगभरातील होणारी आपत्कालीन नैसर्गिक हानी, (भूकंपामुळे) होणारे नुकसान जसे की जैविक, नैसर्गिक, मानवी अथवा आर्थिक टाळता येणे शक्य होईल. म्हणून हा विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमात आला पाहिजे. तसेच अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थांच्या पातळीवर हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळणे आता काळाची गरज झालेली आहे. त्यादृष्टीने उपयुक्त व्हावे, अशी या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे.
मुळातच भूकंप, त्याची कारणमीमांसा जाणून घेऊन त्यांच्या परिणामी जीवित हानी टाळणे, नैसर्गिक आपत्ती टाळणे हे योग्य ठरेल. म्हणून हा विषय शालेय माध्यमिक जीवनापासून घेऊन तो तंत्र शिक्षणामध्ये देखील घेणे आवश्यक ठरेल. हे पुस्तक जगभरातील विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, भूगर्भ वैज्ञानिक, शासकीय / खाजगी प्रयोगशाळा ( उच्चस्तरीय ) व इंजिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासणे प्रेरक ठरेल, असा मला ठाम विश्वास वाटतो.
महादेव सुबराव शितोळे, निवृत्त उप अभियंता म्हाडा, मुंबई यांनी लिहिलेले पुस्तक “जगभरातील भूकंप, स्वरूप भ्रम व वास्तव” अत्यंत वाचनीय आहे. भूकंप हा विषय फार किचकट असला तरी भूकंपाचे परिणाम जगभर जाणवत असतात. त्यामुळे जिवित हानी आणि आर्थिक नुकसान हे प्रत्येक देशाचे होत असते. भूकंपाविषयक सखोल चिंतन श्री. शितोळे यांनी या पुस्तकात विस्तारित रूपाने केले आहे. या पुस्तकाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल. हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. भूकंपाबाबत जागरुकता आणण्यासाठी व लोकांमध्ये भूकंपाविषयक असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. श्री. शितोळे यांच्या जीवनाचा प्रवास हा हलाखीच्या परिस्थितीतून झाला असला तरी त्यांनी खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे वाटचाल केली आहे. ग्रामीण जीवनाची नाळ त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडून परिवर्तनाच्या दिशेने जाण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे.
शिवकुमार आडे,
मुख्य अभियंता/ म्हाडा प्राधिकरण, वांद्रे (पूर्व), मुंबई
भूकंप ही केवळ भौगोलिक घटना नसून ती पृथ्वीच्या अंतर्गत गतिशीलतेची साक्ष देणारी एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. महादेव शितोळे यांच्या भूकंपविषयक या पुस्तकात आपण पृथ्वीच्या प्लेट विवर्तन, सेस्मिक लहरी, भूगर्भातील ऊर्जा साठा व त्याचे स्फोटक परिणाम या सर्व गोष्टींचे अभ्यासपूर्ण विवेचन आलेले आहे. आज समाजासमोर ही शास्त्रीय माहिती येण्याची खरी गरज आहे. त्याची पूर्तता श्री. शितोळे यांच्या पुस्तकामुळे पूर्ण होणार आहे.आपले हे संशोधन सर्वसामान्य वाचकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासकांपर्यंत जाण्याची गरज आहे. आपले पुस्तक या क्षेत्राला नवीन दिशा दाखवेल, याची मला खात्री आहे.
संजय महादेव मोरडे,
सेवानिवृत्त उप-अभियंता म्हाडा, पुणे
पुस्तकाचे नाव – जगभरातील भूकंप – स्वरुप, भ्रम आणि वास्तव
लेखक – महादेव सुबराव शितोळे
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – ९३२२९३९०४०
किंमत – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.