June 13, 2025
Dark monsoon clouds forming over a city skyline, indicating imminent heavy rain.
Home » आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

गेल्या १५ दिवसापासून थंडावलेला व केवळ पुणे-मुंबई पर्यंतच पोहोचलेला मान्सून गुरुवार दि. १२ जून पासुन सक्रिय होवून पुढे झेपावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्र- जोरदार पावसाची शक्यता

          मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या जिल्ह्यात आजपासुन आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. १९ जून पर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यापुढेही ही २-३ दिवस पावसाचे सातत्य टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

मराठवाडा- दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता

          मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यात आज व उद्या, गुरुवार व शुक्रवारी (१२-१३ जून) दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते.  शनिवार दि. १४ जूनपासून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी ह्या जिल्ह्यात एखाद्या दोन दिवशी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

विदर्भात- दोन दिवसानंतर जोरदार पावसाची शक्यता-

           विदर्भातील ११ जिल्ह्यात आज व उद्या, गुरुवार व शुक्रवारी (१२-१३ जून) दोन दिवस तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. शनिवार दि. १४ जूनपासून मात्र त्यापुढील पाच दिवस म्हणजे बुधवार दि. १८ जूनपर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यापुढेही ही २-३ दिवस पावसाचे सातत्य टिकून राहण्याची शक्यता जाणवते. त्यातही यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading