ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी होईल असा अंदाज आहे. हवामान अंदाज जाणून घ्या निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून…
मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील (७+१०) १७ व विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात अश्या एकूण २२ जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. झालाच तर ह्या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ हलकेस्या पावसाची शक्यता जाणवते. अन्यथा नाही. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता जाणवत नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत असून १ ते ७ जानेवारी दरम्यान ह्याच पातळीत राहू शकतात.
ही दोन्हीही तापमाने दरवर्षी ह्या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असुन त्यात विशेष चढ -उतार सध्या तरी जाणवणार नाही, असेच वाटते.
एकापाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी झंजावातातुन गेल्या पंधरवाड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात चालु असलेला धुक्याचा कहर अजूनही तेथे कायम असुन महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही, हेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.