September 8, 2024
Hemorrhoid symptoms, causes and remedies article by Mansi Patil
Home » मूलव्याध लक्षणे, कारणे अन् उपाय
मुक्त संवाद

मूलव्याध लक्षणे, कारणे अन् उपाय

मूलव्याधाची कारणे –

बद्धकोष्ठता – शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.

मूळव्याधाची कारणे काय आहेत
१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
२. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
४. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
५. चुकीची आहार पध्दती- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
८. अनुवंशिकता
९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

मूलव्याधाची लक्षणे

💠शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
💠शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
💠गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
💠गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
💠पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
💠अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.
💠भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
💠रुग्णाचे वजन कमी होते.
💠मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

मूलव्याधावरती घरगुती उपचार

🔰हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
🔰सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.
🔰रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.
🔰ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)
🔰रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
🔰इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.
🔰कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.
🔰झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.
🔰आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.
🔰एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात.
🔰महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
🔰कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.
🔰नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो .
🔰रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.

शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-

✳️देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरबऱ्याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो .
✳️रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . )
✳️गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा .
✳️वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.

मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास:-

मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा.

डॉ. मानसी पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

केतकी सोगावकर मिसेस फिटनेस दिवा 2021

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

राक्षस जन्मास आले….

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading