म्हणून साधकांनी सतत या शत्रूंवर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजेच असल्यास (प्रयत्न) आणि वैराग्य (विरक्ती) यांच्या सहाय्याने त्यांना थोपवले पाहिजे.
डॉ अ. रा. यार्दी
समाधिपाद सूत्र ३१- दु:खदौर्मनस्याङमेजयत्वश्वासप्रश्वासाविक्षेपसहभुव:.
या आधीच्या सूत्रात ज्या विघ्नांचा उल्लेख केला आहे, तर यांमुळे दु:ख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास – प्रश्वास ही विघ्ने/अडथळे निर्माण होतात.
दु:ख – माणसाला तीन प्रकारची दु:खे सतावत असतात. ती आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी आहेत.
आध्यात्मिक दु:ख – मानसिक आणि शारीरिक स्तरावरची दु:खे.
आधिभौतिक दु:ख – पशु, कीटक यांच्यामुळे होणारा त्रास.
आधिदैविक – नैसर्गिक संकटांमुळे विद्युत्पात, अतिवृष्टी, अनावृष्टी, अग्निप्रलय, वादळांचे उत्पात यामुळे कोसळणारी संकटे.
दौर्मनस्य – मनातली कोणतीही इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मन प्रक्षुब्ध होते.
अंगमेजयत्व – शरीराचे अवयव थरथरू लागतात. कंपवातासारखा प्रकार होतो.
श्वास – श्वास आत घेताना ताबा राहात नाही.
प्रश्वास – आतला श्वास बाहेर पडताना श्वासप्रक्रियेवर ताबा रहात नाही.
संगती – विक्षेप/अडथळे हे चंचलचित्त असलेल्यांनाच त्रास देतात. ज्यांचे चित्त एकाग्र झालेले असते, त्यांना हे त्रास होत नाहीत. म्हणून साधकांनी सतत या शत्रूंवर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजेच असल्यास (प्रयत्न) आणि वैराग्य (विरक्ती) यांच्या सहाय्याने त्यांना थोपवले पाहिजे.
समाधीपाद – मनावर ताबा मिळवण्याची प्राणायाम
समाधिपाद सूत्र-३४ प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य
प्रच्छर्दनविधारणाभ्यां = नाकावाटे बाहेर फेकणे आणि रोखून धरणे, अशा दोन्ही प्रकारे किंवा प्राणस्य – कोठ्यातल्या वायूच्या आधारे मनावर ताबा मिळवता येतो. याचा अर्थ प्राणायामाद्वारे मनावर ताबा मिळवावा.
प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यात पूरक – आत घेणे. रेचक – बाहेर सोडणे;
पूरक – आत घेणे, कुंभक – रोखून धरणे, रेचक – बाहेर सोडणे, हे दोन प्रकार लोकांच्या परिचयाचे आहेत. या व्यतिरिक्त अनुलोम विलोम, भस्रिका, कपालभाती, अग्निसारक्रिया हे प्राणायामाचे इतर प्रकार सुद्धा करून बघता येण्यासारखे आहेत. जाणत्यांच्याकडून ते प्राणायाम शिकून घेऊन रोज त्याची अंमलबजावणी करावी आणि मनावर ताबा मिळवावा. आजकाल योगाचा भरपूर प्रसार झालेला आहे. त्यामुळे प्राणायाम शिकवणाऱ्यांची कमतरता नाही. फक्त तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घेणे महत्त्वाचे !.
दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यंदा मला:.
तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषा:प्राणस्य निग्रहात्.
ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात येताच धातूंमधील घाण निघून जाते, त्याप्रमाणे प्राणाच्या मदतीने इंद्रियांचे दोष सुद्धा नाहीसे होतात.
डॉ अ. रा. यार्दी, धारवाड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.