मंगळवेढा : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांचेवतीने २०२० पासुन विविध साहित्यकृतींना पुरस्कार देवून गौरवले जाते. यंदाच्यावर्षीही साहित्य पुरस्कारासाठी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित पुस्तके मागविण्यात आली आहेत, अशी माहिती मसाप दामाजीनगरचे सचिव संभाजी सलगर व लहु ढगे यांनी दिली.
रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुस्तकाची पहिलीच आवृत्ती या पुरस्कारासाठी पात्र असेल. तरी इच्छुक साहित्यिकांनी आणि प्रकाशिकांनी प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती ३१ जानेवारी २०२५ पर्यंत दोन छायाचित्रांसह पाठवाव्यात, असे आवाहन म. सा. प. दामाजीनगर शाखेचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
प्रकाश जडे,
अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर,
धर्मगाव रस्ता, दामाजीनगर ता. मंगळवेढा जि. सोलापुर ४१३ ३०५
अधिक माहितीसाठी संपर्क ९९७०१९२८९८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.